Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Haryana Crime News : दिल्लीच्या माॅडर्न सुनेची जीवनशैली हरियाणाच्या छोट्या गावात राहणाऱ्या सासू सासऱ्यांना कधीही पटली नाही. यावरुन कुटुंबात वाद होऊ लागले आणि शेवटी हतबल होऊन सासू सासऱ्यांनी स्वत:च आयुष्यचं संपवलं.

  • By नुपूर भगत
Updated On: May 14, 2026 | 03:00 PM
सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Follow Us
Close
Follow Us:
  • हरियाणातील पानीपतमध्ये सुनेच्या जीवनशैलीवरून कुटुंबात सतत वाद होत असल्याचा आरोप आहे.
  • सासू-सासऱ्यांनी विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  • पोलिसांनी सून आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
स्टायलिश कपडे घालून रिल बनवण्याची आवड अनेकांना आहे पण यामुळे कुणी आपलं आयुष्य संपवू शकतं यावर तुमचा विश्वास बसेल का? हरियाणात अशी घटना सत्यात घडून आली आहे ज्यात सुनेच्या जीवनशैलीला कंटाळून सासू-सासऱ्यांनी आपलं आयुष्य संपवून टाकलं. सांगितलं जात आहे की, सून लहान कपडे घालून रिल बनवायची जी गोष्ट तिच्या सासू-सासऱ्यांना कधीही पटली नाही. अनेक महिने कुटुंबात यावरुन वाद सुरु होता आणि अखेर कंटाळून दुःखी होऊन सासू सासऱ्यांनी स्वत:लाच संपवण्याचा निर्णय घेतला.

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

सदर घटना ही हरियाणातील पानीपत शहरातील नारा गावातून समोर येत आहे. राजेश (46) आणि सुमन (44) यांचा एकुतला एक मुलगा राजेश याचे दिल्लीच्या स्नेहासोबत लग्न झाले होते. सांगितले जात आहे की, इंस्टाग्रामवर स्नेहाच्या रिल्स पाहून आशीष तिच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये संवाद सुरु झाला. पुढे जाऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने जानेवारी २०२५ मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

सुनेची माॅर्डन जीवनशैली सासू-सासऱ्यांना पटली नाही

स्नेहा ही लग्नाच्या आधीपासूनच एका माॅर्डन घरात राहिलेली होती, ज्यामुळे तिची जीवनशैली आणि राहणीमान गावात राहणाऱ्या तिच्या सासू-सासऱ्यांनी कधीच पटली नाही. सुनेचे लहान कपडे घालणे, रिल बनवणे आणि अधिकतर वेळ इंस्टाग्राम-फेसबुकवर घालवणे त्यांना आवडत नव्हते. सुरुवातीला त्यांनी यावर आक्षेप आणला नाही पण वेळेसोबतच त्यांनी तिला टोकण्यास सुरुवात केली. आता स्नेहाला देखील आपल्यात कुणी ढवळाढवळ केलेलं फार आवडतं नव्हतं ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. कुटुंबात वादाची ठिणकी पेटली होती आणि ही ठिणकी काही केल्या विझत नव्हती. वैयक्तिक वाद वाढले होते. स्नेहा राजेश आणि सुमनला मारहाण करत असल्याचाही आरोपही सासरच्या मंडळींनी केला आहे.

मुलगा घेत होता बायकोची बाजू

सासरच्या मंडळींनी सांगितलं की, राजेश वादात नेहमी पत्नी स्नेहाची बाजू घ्यायचा जी गोष्ट त्याच्या आईवडिलांना कधीच पटली नाही. याच पार्श्वभूमीवर, शनिवारी पुन्हा एकदा स्नेहा आणि सासू-सासऱ्यांमध्ये वाद झाला. आरोप केला जात आहे की, यानंतर राजेश आणि सुमन फार दुःखी झाले आणि त्यांनी सल्फा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांचीही प्रकृती ढासळली आणि त्यांना पानीपतच्या सिव्हिल हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे पोहचताच सुमनला मृत घोषित करण्यात आलं तर राजेशचा रविवारी उपचारादरण्यान मृत्यू झाला.

Kalyan Crime: कल्याण हादरलं! लुडोच्या वादातून अल्पवयीन मामानेच भाच्याची केली हत्या; आरोपी अटकेत

पोलिसांनी तक्रार केली दाखल

रिपोर्टनुसार, मटालाैडा पोलिसांनी कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारावर चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासाठी आरोपी स्नेहा आणि यासहच तिचे आई, वडिल आणि बहिणीवरही खटला दाखल करण्यात आला आहे. एसआय राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मृत राजेशच्या भावाच्या तक्रारीच्या आधारावर चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Haryana panipat in laws died by suicide after family dispute over daughter in short clothes and social media reels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • crime news
  • Haryana
  • Suicide case

संबंधित बातम्या

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू
1

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर…
2

पुणे हादरलं! 82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून; कारण काय तर…

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
3

खळबळजनक! आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

75 टक्के गुण मिळूनही दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; घरी कोणी नसल्याची संधी साधली अन्…
4

75 टक्के गुण मिळूनही दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; घरी कोणी नसल्याची संधी साधली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.