crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराज असल्याचे सोंग घेत चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याची कुणकुण लागताच पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य संशयित ‘गोट्या महाराज’ उर्फ परमेश्वरानंद हा पसार झाला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कसे आले प्रकरण उघडकीस?
स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली होती की दुचाकीवरून गांजाची विक्री करण्यासाठी एक तरुण साताऱ्यात येणार आहे. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास 385 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने कबुली दिली आहे की, हा माल तो ‘परमेश्वरानंद महाराज’ यांच्याकडून आणतो. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गेवराई बुद्रुक परिसरातील डोंगर गाठला. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना जनावरांच्या गोठ्यात 30 किलो गांजा सापडला. पोलिसांनी हा साठा जप्त करून गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच संशयित ‘गोट्या महाराज’ पसार झाला.
विशेष पथक नियुक्त
परमेश्वरानंद उर्फ गोट्या महाराज हा डोंगर परिसरात वास्तव्यास असून, तिथे तो तिथे तो जनावरं पाळतो, सेंद्रिय खताची निर्मिती व विक्री करतो. तो कामाच्या आडोशाला तो गांजाची लागवड आणि विक्री करत असल्याचं उघड झालं. पोलिसांच्या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अटक झालेल्या तरुणाची ओळख लहू बंडूबा मोरे (वय 25, रा. सिंदोर) अशी झाली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा साठा पोलिसांनी उघडकीस आणला. सध्या पसार झालेल्या ‘गोट्या महाराजां’चा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
डंपरखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यात डंपरच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी (दि. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास किवळे येथील सई द्वारका हौसिंग सोसायटीसमोर ही भीषण घटना घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव दीपाल बहादूर साई (वय ३२, रा. विकासनगर, देहूरोड) असे असून, ते खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.
बारावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन, कारण…