crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
बीड: बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचं गूढं उलगडलं आहे.
का करण्यात आला खून?
पोलीस तपासात धक्कदायक माहिती समोर आली आहे. दीपक बिल्ला याची हत्या त्याच्यासोबत मेंढपाळीचं काम करणाऱ्या विलास मोरे या साथीदारानेच केली. सतत चिडवणं आणि बोलण्यातून झालेला राग यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. संतापाच्या भरात विलास मोरे याने दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी विलास मोरे घटनास्थळावरून फरार झाला आहे. तो पाटोदा तालुक्यातील डोंगर शिवारात लपून बसला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. चार दिवसांच्या सततच्या शोधमोहीमेनंतर अखेर पोलिसांच्या हाती तो लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
कसा लावला शोध
पोलिसांसमोर दीपक बिल्लाच्या हत्येचा गूढ उकलनं हे मोठं आवाहन होत. सुरुवातीला कोणत्याही वैरातून हत्या झाल्याचा संशय उपस्थित झाला होता. मात्र,परिसरातील साक्षीदारांची माहिती आणि तपासाच्या धागेदोऱ्यांवरून अखेर आरोपी साथीदारापर्यंत पोलीस पोहोचले. पाटोदा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी घरच्यांना फोन करून म्हंटल…
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून एक महत्त्वाची माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, ‘तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.’ असे असूनही, तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून 25 कॉल आले होते.
Accident : समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू