Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime : पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईन पंजाबमध्ये दाखल, १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

“नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या अनुषंगाने पंजाब राज्यातून ट्रक तसेच रेल्वे मार्गाने हेरॉईन व अफू यांसारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे दाखल करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 16, 2026 | 08:03 PM
पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईन पंजाबमध्ये दाखल, पोलिसांकडून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त

पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईन पंजाबमध्ये दाखल, पोलिसांकडून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानातून ड्रोनद्वारे हेरॉईन पंजाबमध्ये दाखल
  • १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पंजाबहून ड्रग्ज तस्करी करणारे तिघे आरोपी पुण्यात अटकेत
सावन वैश्य, नवी मुंबई: “नशा मुक्त भारत २०२८” अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत पंजाबहून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघा आरोपींना पुणे परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ८२.६ ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन, ऑस्ट्रियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल, ०२ मॅगझिन, ०४ जिवंत काडतुसे, ट्रेलर तसेच मोबाईल व वजनकाटा असा एकूण सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

“नशा मुक्त भारत २०२८” या अभियानाच्या अनुषंगाने पंजाब राज्यातून ट्रक तसेच रेल्वे मार्गाने हेरॉईन व अफू यांसारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आतापर्यंत ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत एकूण सुमारे ६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास तळोजा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८४/२०२५ एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत सुरू असताना पहिला आरोपी बलजीत सिंह आणि त्याचा साथीदार गोपी हे दोघे पंजाबचे रहिवासी असून ते नवी मुंबई, मुंबई आणि पुणे परिसरात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच हे आरोपी मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

बापरे…!पुणे रेल्वे स्थानकांवर छुप्या कॅमेऱ्यांतून हेरगिरी? पुणे विभागात हाय अलर्ट

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिक येथे ट्रकचा पाठलाग करून पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी , डिंगोजे गाव (पिंपरी-चिंचवड परिसर) येथे कारवाई केली. या कारवाईत १) बलजीतसिंग सतविंदर सिंग उर्फ मोनू, 2) गुरुप्रतापसिंग शरणजीत सिंग उर्फ गोपी, ३) ट्रक चालक करमजितसिंग नरिंदरसिंग, रा. अमृतसर, पंजाब या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून ८२.६ ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन (किंमत सुमारे ४९ लाख ३० हजार रुपये), ऑस्ट्रियन बनावटीचे ग्लॉक पिस्तूल (८ लाख रुपये), २ मॅगझिन, ४ जिवंत काडतुसे (२ लाख ५० हजार रुपये), ट्रेलर (५० लाख रुपये), तसेच ४ मोबाईल फोन व वजनकाटा असा एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने १८ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, तसेच सहायक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस हवालदार तायडे, पोलीस शिपाई धांडे, पोलीस शिपाई पालवे आणि पोलीस शिपाई चव्हाण यांनी केली.

Fake Ration Card Case: धक्कादायक! सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड; जलील यांच्या दाव्यानंतर गुन्हा दाखल

Web Title: Heroin entered punjab from pakistan via drone goods worth seizure of goods worth 1 crore 3 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
2

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर
4

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.