Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Ganeshotsav 2026: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर ८ येथील ‘सानपाडाचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा ३२ वर्षे पूर्ण केली आहेत. मंडळाने ‘समुद्र मंथन’ या संकल्पनेवर आधारित प्लास्टिकमुक्त देखावा साकारला आहे. तसेच संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देत माणुसकी जपण्याचे आवाहन या देखाव्यातून करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2026 | 01:19 PM
अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या! ‘सानपाडाचा राजा’ मंडळाचा माणुसकीचा जागर

Follow Us
Follow Us:
  • ‘माणसातील माणूस हरवलाय’
  • अपघातात व्हिडिओ नको, मदतीचा हात द्या!
  • सानपाडाच्या राजाचा ‘समुद्र मंथना’तून माणुसकी जपण्याचा संदेश
Ganeshotsav 2026: नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर ८ येथील प्रसिद्ध ‘सानपाडाचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 33 वर्ष साजरा करत आहे. १९९४ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने यंदा पौराणिक ‘समुद्र मंथन’ संकल्पनेला आधुनिक सामाजिक वास्तवाची जोड देत माणुसकीचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे देखाव्याच्या निर्मितीत प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही देण्यात आला आहे.

‘माणसातील माणूस हरवलाय’ हा यंदाच्या देखाव्याचा केंद्रबिंदू आहे. एखादा अपघात किंवा दुर्घटना घडल्यानंतर मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्याची वाढती प्रवृत्ती, सोशल मीडियावर तो व्हिडोओ व्हायरल करण्याची घाई आणि गर्दीत असूनही संकटग्रस्ताला मदत न मिळणे, या मुद्द्यांकडे देखाव्यातून लक्ष वेधण्यात आले आहे.

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

…मोबाईलचा कॅमेरा आधी पुढे

पूर्वी एखाद्या व्यक्तीवर संकट ओढवल्यानंतर आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून येत होते. मात्र, आज काही घटनांमध्ये मदतीच्या हातापेक्षा मोबाईलचा कॅमेरा आधी पुढे येताना दिसतो. या प्रवृत्तीचा उल्लेख देखाव्यात ‘कॅमेरा-मॅन कल्चर’ असा करण्यात आला आहे. तसेच मानसशास्त्रातील ‘बायस्टँडर इफेक्ट’ या संकल्पनेचीही माहिती देण्यात आली आहे. गर्दीत प्रत्येक व्यक्तीला दुसरे कोणीतरी मदत करेल असे वाटते आणि परिणामी प्रत्यक्ष मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही, याकडे मंडळाने लक्ष वेधले आहे.

‘दुःख हे कंटेंट नाही, रक्त हे मनोरंजन नाही आणि माणसाचे आयुष्य व्ह्यूज आणि लाईक्सपेक्षा मोठे आहे,’ असा प्रभावी संदेश देखाव्यातून देण्यात आला आहे. अपघात दिसल्यानंतर व्हिडिओ काढण्यापेक्षा सर्वप्रथम आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधावा आणि शक्य असेल तेवढी प्रत्यक्ष मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कलियुगाची ‘समुद्र मंथना’शी सांगड

मंडळाने पौराणिक समुद्र मंथनाची संकल्पना आजच्या समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कलियुगातील समाज आणि मानवी मनाला ‘क्षीरसागर’, तर द्वेष, हिंसा, स्वार्थ, अहंकार आणि दुसऱ्याच्या संकटाचे व्हिडिओ काढण्याच्या प्रवृत्तीला मंथनातून बाहेर पडणाऱ्या ‘विषा’ची उपमा देण्यात आली आहे.

दुसरीकडे नामस्मरण, भक्ती, शांतता आणि माणुसकीला ‘अमृत’ मानण्यात आले आहे. रोजच्या जीवनातील तणाव, स्वार्थ आणि नकारात्मकतेवर मात करत माणुसकी जपण्याचा संदेश गणेशभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

गणरायाला दरवर्षी मोदक अर्पण करताना यंदा ‘आपले मोठे मन’ अर्पण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहनही करण्यात आले आहे. अपघातग्रस्ताला मदत करणे, शेजाऱ्याची विचारपूस करणे, वृद्धांना आधार देणे, गरजू व्यक्तीच्या मदतीला धावणे आणि सोशल मीडियाचा वापर तमाशासाठी नव्हे तर सकारात्मक संदेश पसरवण्यासाठी करणे, या छोट्या कृतींमधून माणुसकी जिवंत ठेवता येईल, असा संदेश मंडळाने दिला आहे.

‘माणसातील माणूस हरवलेला नाही, त्याला फक्त जागे करण्याची गरज आहे,’ या संदेशासह यंदाचा ‘समुद्र मंथन’ देखावा श्रद्धा, सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरकतेची सांगड घालणारा ठरत आहे.

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

Web Title: Sanpada cha raja ganeshotsav 2026 samudra manthan theme humanity message plastic free decoration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
1

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
2

Kolhapur Ganpati: कोल्हापुरातील ‘भू-अधिपती’ गणपती ठरतोय आकर्षण; मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा
3

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर या गोष्टींचे करा दान, ग्रहदोषांपासून मिळेल दिलासा

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.