Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला थेट…; रत्नागिरीत घडला भीषण अपघात

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिनेश महादेव हरचकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक तवाब वाडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 24, 2026 | 03:10 PM
Accident News: भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला थेट…; रत्नागिरीत घडला भीषण अपघात
Follow Us
Follow Us:

रत्नागिरीत टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वार गंभीर
शहरातील रस्त्यावर झाला भीषण अपघात
शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर ते आठवडा बाजार जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रुद्र हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजन जयवंत जाधव (वय ७३, रा. शंखेश्वर गार्डन, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दि. ५ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास राजन जाधव हे आपल्या दुचाकीने मारुती मंदिरहून आठवडा बाजाराच्या दिशेने जात होते. याच वेळी टेम्पो चालक तवाब मोहसीन वाडकर (वय २२, रा. भाट्ये नवानगर, रत्नागिरी) टेम्पो घेऊन त्याच मार्गावरून जात होता. रुद्र हॉटेलसमोर आले असता, टेम्पो चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता हयगयीने आणि वेगात वाहन चालवले. यामुळे टेम्पोची धडक दुचाकीला बसली आणि राजन जाधव खाली पडले.

दुर्दैवाने टेम्पोचे मागील डावे चाक जाधव यांच्या डोक्यावरून आणि कानावरून गेल्याने त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडून काही दिवस उलटल्यानंतर, २१ मार्च रोजी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार दिनेश महादेव हरचकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक तवाब वाडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Accident: गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

खेडमध्ये घडला विचित्र अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीकच्या नव्या जगबुडी पुलावर रत्नागिरीकडे जाणाच्या कार चालकाचे अचानक नियंत्रण सुटून कार कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन चढली. मात्र या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. अपघात इतका भीषण होता की, कार थेट नदीकाठी असलेल्या कठड्यावर जाऊन अडकली. कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत झाली सुदैवाने नाही.

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

हा अपघात घडताच महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नेमका अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती. प्रत्यक्षदर्शीच्या मते, कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट कठड्‌याकडे झेपावली.

 

Web Title: High speed tempo hit bike and 73 years old perosn injured ratnagiri crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Accident
  • Ratnagiri
  • Ratnagiri Crime Case

संबंधित बातम्या

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
1

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू
2

Missing Link Accident : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, फॉर्च्युनरचा चुराडा; एकाचा मृत्यू

Karjat News: कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू
3

Karjat News: कर्जत-खोपोली मार्गावरील धोकादायक अरुंद रस्ता पुन्हा ठरला जीवघेणा; वॅगनार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?
4

Atiq Ahmed: एकामागोमाग एक संकटे; माफिया डॉन अतीक अहमदचा धाकटा मुलगा ठार, कसं उद्ध्वस्त झालं संपूर्ण कुटुंब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.