काय घडलं नेमकं?
लक्ष्मण वाघमारे याचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून गावातीलच रविकुमार भीमाशंकर पुटके याला होता. या संशयामुळे आरोपी अनेक दिवसांपासून लक्ष्मणवर पाळत ठेवून होता. बाजाराच्या दिवशी दुपारपासूनच आरोपी त्याच्या मागावर होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
बुधवारी वळसंग येथे आठवडा बाजार भरला होता. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास बाजारातील सिद्धेश्वर चौक परिसरात लक्ष्मण वाघमारे याला एकटं गाठलं आणि आरोपीने चक्क त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. जवळ बाळगलेल्या कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. एवढेच नाही तर, खाली कोसळलेल्या लक्ष्मणच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची निर्दयपणे हत्या करण्यात आली. हल्ल्याची तीव्रता इतकी होती की मृताच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.
हत्येनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मण वाघमारे याना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णलयात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मृत्यूची बातमी समजताच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मित्र, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस तपास सुरु
ही हत्या शेजारी राहणाऱ्या रविकुमार भीमाशंकर पुटके याने केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातूनच हि हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.आरोपीने पूर्वनियोजित कट रचूनच ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण वसंत वाघमारे असे आहे. तो व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पोलीस या घटनेचा तपास करत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेण्यास आणि पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.
Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू
Ans: सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात, आठवडा बाजाराच्या दिवशी.
Ans: लक्ष्मण वसंत वाघमारे (वय 35), व्यावसायिक ड्रायव्हर.
Ans: हत्या कशामुळे झाली?






