धनगर आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
सोलापूर : मानसिक त्रासाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध फौजदार चवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 8 जून रोजी सुपर मार्केट बाजूला सोलापूर येथे घडली होती. याप्रकरणी विशाल महादेव हजारे (रा. निराळे वस्ती सोलापूर ) यांनी आरोपी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर हजारे, राजश्री पवार, मंगेश पवार, नाना काळे, निखिल बनसोडे आणि ओम घाडगे (रा. माहिती नाही) अशा सात जणांविरुद्ध फौजदार चवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सन २०२३ ते ८ जून २०२५ या दरम्यान फिर्यादी विशाल हजारे यांचा भाऊ मयत ओंकार हजारे व आरोपी स्वाती हजारे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्याने २०१९ मध्ये प्रेम विवाह केला होता. या लग्नाला आरोपी स्वाती हिच्या घरच्यांचा विरोध होता. स्वाती हिच्या घरच्यांनी ओंकार याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. २०२३ मध्ये ओंकार व स्वाती यांच्यात भांडण झाल्यानंतर ते विभक्त झाले होते.
हेदेखील वाचा : धक्कादायक! महिलेची ६ वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या; कारण वाचून बसेल धक्का
दरम्यान, आरोपी स्वाती हिने घटस्फोटाची मागणी केली होती. परंतु, यांचा भाऊ ओंकार हा तिला नांदविण्यास तयार असल्याने तो घटस्फोट देत नव्हता. घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्याने ओंकार याला यातील आरोपींकडून मानसिक त्रास दिला जात होता. या सर्व प्रकाराला कंटाळून ओंकार हजारे याने आत्महत्या केली. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्यात विवाहितेची मुलासह आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात एका विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्यासोबत इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयुरी शशिकांत देशमुख (वय ३१) तसेच विष्णु देशमुख (वय ६) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : आधी मिरची पुढं टाकली, नंतर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; काय घडलं नेमकं?