यवतमाळच्या पुसदमध्ये उधारीचे पैसे मागणाऱ्याला जबर मारहाण; चुलत्यालाही सोडलं नाही (File Photo : Crime)
नांदेड : शहरातील बियाणी पार्क कौठा येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१५) रात्री नऊच्या दरम्यान घडली. ग्रामीण पोलिसांनी पत्नी कल्पना आनंद तोषणीवल हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बियाणी पार्क कौठा येथे आनंद अशोक तोषणीवाल आणि कल्पना आनंद तोषणीवाल हे पती पत्नी राहत होते.
हेदेखील वाचा : Narendra Modi: ‘काँग्रेसने संविधानाला धक्का पोहोचवण्यासाठी एकही संधी सोडली नाही,’ पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पती आनंद यांनी त्यांची प्रॉपर्टी ही नावे करून द्यावी, म्हणून आरोपी पत्नी कल्पना ही त्यांना त्रास द्यायची. नेहमी भांडण करायची. 15 डिसेंबर रोजी ही दोघा पती-पत्नीमध्ये याच कारणावरून वाद झाले. यावेळी आरोपी पत्नी कल्पना हिने आनंद यांच्यावर हात उगारल्याने झालेला अपमान सहन न होऊन रात्री नऊच्या दरम्यान आनंद यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, या घटनेची तकार आनंद यांच्या आई सुशीला तोषणीवाल यांनी ग्रामीण पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी पत्नी कल्पना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक महेश गायकवाड तपास करत आहेत.
जुगारावर छापा
नांदेड हदगाव पोलिसांनी वाळकी येथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या विरुध्द गुन्हा नोंदविला. पोलिसांनी यावेळी रोख २ हजार ४९० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिस जमादार दत्ता मुंडीक तपास करत आहेत.
बेंगळुरू येथे कार्यरत एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेंगळुरू पोलिसांनी रविवारी अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना अटक केली. अतुलने आपल्या मृत्यूसाठी पत्नी निकिता आणि सासरच्या मंडळींना जबाबदार धरले होते.
पोलिसांनी निकिताला गुरुग्राममधून, तर सासू निशा आणि मेव्हणा अनुरागला प्रयागराज, यूपी येथून अटक केली आहे. न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अतुलने ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली. सुमारे दीड तासाचा व्हिडिओ आणि 24 पानांची सुसाईड नोटही त्याने सोडली होती. यामध्ये अतुलने पत्नी व सासरच्या मंडळींवर बळजबरीने पैसे उकळून खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिल्याचा आरोप केला होता.
हेदेखील वाचा : 2 मुलांची आई 18 वर्षाच्या तरुणाच्या प्रेमात, प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पुढे जे घडलं ते वाचून व्हाल हैराण