नांदेड: नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जात होती तेव्हा हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली असून ही अपघाताची दुसरी घटना आहे.
देगलूरमध्ये एसटी बसचा अपघात
नांदेडच्या देगलूरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बेलूर येथे ही घटना घडली आहे. हाणेगाववरून देगलूरकडे ही बस जात होती. बेलूरजवळ येताच चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली.
यावेळी बसमधे ३१ प्रवाशी होते. ३ प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असून २८ प्रवासी जखमी झाले आहे. गंभीर जखमी प्रवाश्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ प्रवाशांवर देगलूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एसटी बसची वाहक सुरेखा शिंपाळे या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची तुरूंगातून सुटका; ‘या’ प्रकरणात भोगली १८ वर्षांची शिक्षा
गेल्या १८ वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या मागच्या गेटने मीडियापासून लपवत पोलिसांनी अरुण गवळीची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती.
अरुण गवळी २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २००७ मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना नागपूर तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
२ मार्च २००७ रोजी सायंकाळी घाटकोपर येथील असल्फा व्हिलेजमधील रुमानी मंझील चाळीत राहत्या घरात टीव्ही पाहत असताना शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, सहआरोपी सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.
Rajasthan crime : ‘ही क्रीम लाव, गोरी होशील’, फसवणूक करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळले