crime (फोटो सौजन्य: social media)
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमधून संतापजनक घटना समोर आली आहे. 4 बीएचकेऐवजी 2 बीएचके फ्लॅट घेऊन देण्यासाठी तगादा लावलेल्या मुलीच्या सासरच्यांना समजावयाला आलेल्या सासूदेखत जावयाने पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती सासू साऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन विष्णू ढाकणे असे आरोपी पतीचे नाव आहे.
नेमकं काय प्रक्ररण आहे?
छत्रपती संभाजीनगरच्या उल्कानगरील भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या मुलीचे फोटो सापडल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद वाढला आणि माहेरच्यांनी फ्लॅट घेऊन दिल्यानंतरही पत्नीचा छळ थांबला नाही. अखेर सासू घरी समजावण्यासाठी आल्या असता, जावयाने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
मुलगी प्राध्यापक आहे. लग्नानंतर एका महिन्यानंतरच पती आणि सासूने पीडित तरुणीला छळ सुरु केला होता. तुझी मुलं मी सांभाळते त्यामुळे तू नोकरी करू शकते असं म्हणत सासूने पीडित विवाहितेचा छळ केला. तिच्या डोक्यात स्टीलची बॉटलही मारल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये पतीच्या मोबाईल मध्ये पीडितेला दुसऱ्या मुलीचे फोटो आढळून आले होते .त्यावरूनही दोघांमध्ये अनेक वाद झाले.
याचा जाब विचारला असता मला दुसरे लग्न करायचे आहे असे म्हणत पीडित तरुणीला पतीने वारंवार धमक्याही दिल्या. वारंवार फोर बीएचके फ्लॅट घेऊन देण्यासाठी पतीने पत्नीकडे तगादा लावला. सासरच्या सासरच्या होणाऱ्या सततच्या त्रासामुळे पीडित विवाहितेची आई जावयाला समजावून सांगण्यासाठी घरी आली तेव्हा सासू देखत पतीने तरुणीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पतीसह सासू- सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे PA असल्याची बतावणी करत ५५ लाखांची फसवणूक