दारू न पाजल्याने व्यक्तीवर चाकूहल्ला (File Photo)
नवी मुंबई: नवीमुंबई येथील तळोजा परिसरातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. काही लोकांनी मुस्लिम कुटुंबावर धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मुस्लिम कुटुंब एका गावातून शुक्रवाररी दुपारी नमाज अदा करून घरी परतत होते. या हल्ल्यात किमान १२ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक स्तरावरील वैयत्तिक वादामुळे हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोरांकडून धारधार शस्त्रं होती आणि त्यांनी मुस्लिम बांधवांवर थेट वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा तळोजा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेला नाही आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
पिडीतांनी वारंवार तक्रारी केली परंतु पोलिसांनी गंभीरपणे दाखल घेतली नाही, उलट गुन्हा नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे आता या प्रकरणाची जबाबदारी आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हिंसक घटनेनंतर तळोजा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांकडून निष्पक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन विवाहीत महिला टोकाचं पाऊल उचलतांना दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महिलांनी आत्महत्या केली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील फुरसूंगीत पती व सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राहत्या घरात तिने फॅनला ओढणीने गळफास लावून जीवन संपवले आहे.
सीमा अक्षय राखपसरे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अक्षय सुरेश राखपसरे, चुलत सासरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवि खलसे (वय ५०) यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) घडली आहे.