
'पत्नीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले तर...' उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)
chhattisgarh High court News marathi: छत्तीसगड उच्च न्यायालयाने लैंगिक संबंध किंवा अनैसर्गिक लैंगिक संबंधांबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. पती-पत्नीमधील नात्याबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला असून कोणत्याही प्रकारचे लैंगिक कृत्य म्हणजेच पतीने पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी केलेले अनैसर्गिक लैंगिक संबंध म्हणून ओळखले जाऊ शकत नाहीत. याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने एका आदेशात ही टिप्पणी केली आणि आरोपी पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४, ३७६ आणि ३७७ अंतर्गत सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने त्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात न्यायालयाने गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता आणि सोमवारी (१० फेब्रुवारी) निकाल दिला. उच्च न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार बस्तर (जगदलपूर) येथील रहिवासी असलेल्या याचिकाकर्त्या पतीने ११ डिसेंबर २०१७ च्या रात्री पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले.
या कृत्यामुळे पीडितेला असह्य वेदना झाल्या आणि नंतर उपचारादरम्यान तिचा रुग्णालयात मृत्यू झाला, असा आरोप पतीवर करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला अटक केली. कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक कृत्य), ३७६ (लैंगिक संबंध) आणि ३०४ (खून न करता सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवले आणि त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की जर पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा कमी नसेल, तर पतीने केलेले कोणतेही लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृत्य लैंगिकसंबंध म्हणून ओळखले जाऊ शकत नाही, असा निर्णय देण्यात आला.
न्यायालयाने असेही म्हटले आहे की, या परिस्थितीत पत्नीची संमती आपोआपच गौण ठरते आणि म्हणूनच आयपीसीच्या कलम ३७६ आणि ३७७ अंतर्गत गुन्हा अपीलकर्त्या पतीविरुद्ध टिकत नाही. त्याचप्रमाणे, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गत, कनिष्ठ न्यायालयाने कोणताही विशिष्ट निष्कर्ष नोंदवलेला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयात याचिकाकर्त्या पतीला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे आणि त्याला तात्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.