काय घडलं नेमकं?
यमगर यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. यामुळे संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा व तेरा वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. ज्यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच
आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे. मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे.
धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण
सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना निंबवडे (ता. आटपाडी) येथे घडली.
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे नाव आहे. पोलिसांनी अंकुशला अटक केली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामागे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
Ans: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात.
Ans: चोरीच्या संशयातून पित्याने हा प्रकार केला.
Ans: आरोपी पित्याला अटक करून तपास सुरू केला आहे.






