Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: तू तक्रार केलीस तर तुला बघून घेतो…; मेकअप आर्टिस्टवर भररस्त्यात प्राणघातक हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मेकअप आर्टिस्टवर रस्त्यातच जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 22, 2025 | 12:57 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मेकअप आर्टिस्टवर रस्त्यातच जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. ही घटना शहरातील उद्धवराव पाटील चौकात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली आहे. जुन्या वादाने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Mumbai Crime: भिवंडीतून फिलिस्तीनला पैसे पाठवण्याचा संशय; एटीएसकडून तीन संशयित दहशतवादी ताब्यात

नेमकं काय घडलं?

हा हल्ला संजीत संजित संजय थोरात (वय 24, रा. भारतमातानगर, एन-12) यांच्यावर झाल्याचे समोर आले आहे. ते व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहेत. हल्ला झालेल्या दिवशी थोरात हे आपल्या दुचाकीचे पंक्चर काढण्यासाठी उद्धवराव पाटील चौकात गेले होते. त्याचवेळी शेखर पोतदार (वय 34, रा. बी सेक्टर, टीव्ही सेंटर) व प्रज्वल राजपूत (वय 25) हे दोघे तेथे आले. जुन्या भांडणाचा विषय काढून त्यांनी थोरात यांना अडवले व शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

तू पोलिसांत तक्रार केलीस तर…

हा हल्ला एवढा अचानक झाला की संजीत थोरात यांना कळलच नाही की होत काय आहे. त्यांनी प्रतिकार करत “मला का मारत आहात?” असा जाब विचारला.त्यावर संतापलेल्या शेखर पोतदार यांनी थोरात यांना धमकी दिली की, “तू पोलिसांत तक्रार केलीस तर तुला बघून घेतो.” एवढ्यावर न थांबता पोतदार यांनी हातातील कडे काढून थोरात यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यामुळे थोरात गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी प्रज्वल राजपूत यांनी हातातील संजित थोरात यांच्या डोक्यावर आणखी एक प्राणघातक हल्ला केला. सलग वारांमुळे थोरात यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आधीही धमकावले

या घटनेनंतर थोरात यांनी थेट बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी शेखर पोतदार आणि प्रज्वल राजपूत या दोघांविरुद्ध मारहाण, जीवघेणा हल्ला व धमकावणे यासह भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींची आधीही भांडणाचा मुद्दा उपस्थित करून धमकावले असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Crime: पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच देवासमोरच घेतला फास

Web Title: If you complain we will look into you make up artist fatally attacked on the street

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 12:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh: पतीचा चकित करणारा निर्णय! पत्नीचे तिच्या प्रियकराशी लावून देणार लग्न एवढेच नाही तर…
1

Uttarpradesh: पतीचा चकित करणारा निर्णय! पत्नीचे तिच्या प्रियकराशी लावून देणार लग्न एवढेच नाही तर…

Hyderabad crime: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीचा संताप, क्रिकेटच्या बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार करून केली हत्या
2

Hyderabad crime: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीचा संताप, क्रिकेटच्या बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार करून केली हत्या

Delhi Crime: दुसरं लग्न ठरवण्यासाठी दिले ६० हजार, मात्र प्रेमाऐवजी मिळाली फसवणूक आणि रक्तरंजित रात्र; काय घडलं नेमकं?
3

Delhi Crime: दुसरं लग्न ठरवण्यासाठी दिले ६० हजार, मात्र प्रेमाऐवजी मिळाली फसवणूक आणि रक्तरंजित रात्र; काय घडलं नेमकं?

AK-47 पासून ते 300 किलो RDX…, डॉ. आदिल अहमद राथेर कोण आहे? दहशतवादी की डॉक्टर…
4

AK-47 पासून ते 300 किलो RDX…, डॉ. आदिल अहमद राथेर कोण आहे? दहशतवादी की डॉक्टर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.