crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्याबेकायदेशीर प्रकरणांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच कला केंद्रांवर धाड टाकली. या छापेमारीत नियमभंगाचे धक्कादायक प्रकार उघड झाले असून संबंधित केंद्रचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यातील लोहगाव भागात रिक्षाचालकावर हल्ला; बांबूने मारहाण करुन लुटले
ही कारवाई मध्यरात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. यामध्ये धाराशिव तालुक्यातील आळणी येथील साई आणि पिंजरा या कला केंद्रांवर तर चोराखळी पाटी येथील गौरी, कालिका आणि महाकालिका या केंद्रांवर छापे टाकण्यात आले. याआधी याच चोराखळीतील महाकाली कला केंद्रात महिनाभरापूर्वी गोळीबाराची घटना देखील घडली होती. त्यामुळे हे कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कलाकेंद्रांवर छापे टाकले असून नियमानुसार कलाकारांसाठी स्टेजवर नृत्याची व्यवस्था करणे बंधनकारक असताना, या ठिकाणी बंद खोलीत रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरू असल्याचे समोर आले. तसेच नियमांना डावलून रात्री उशिरापर्यंत ही कला केंद्र सुरू असल्याची चर्चा आहे. या बेकायदेशीर प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्येही तीव्र नाराजीच वातावरण आहे. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 (नवीन भारतीय न्याय संहिता कलम 223) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील इतर केंद्रचालकांचे धाबे दणाणले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका माजी उपसरपंचाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. तो कलाकेंद्रामधील एक मुलीच्या प्रेमात अडकला होता. तिचा दुरावा सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर वाशी तालुक्यातील वादग्रस्त तुळजाई लोकनाट्य कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन सजग झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जमिनीच्या वादातून भररस्त्यात पती पत्नीची निर्घृण हत्या
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार करत पती- पत्नीची हत्या केली. हा प्रकार धाराशिव तालुक्यातील करजखेडा पाटोदा चौकात बुधवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर दोन्ही संशयित आरोपी फरार असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
सहदेव पवार आणि प्रियांका पवार असे हत्या झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. तर संशयित आरोपींची नावे जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण अशी आहे. हे दोघेही सध्या फरार आहे. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार