Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड; सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chhatrapati Sambhajinagr: एका दिवसात आणि अगदी एका तासात पोलिसांनी सलग दोन कारवाया करत वाळूज परिसरातील बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे जाळे उद्धवस्त केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 17, 2025 | 04:17 PM
वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड (Photo Credit - X)

वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • वाळूजमध्ये अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड
  • सिलेंडरसह १.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • एका दिवसात दोन ठिकाणी छापे

छत्रपती संभाजीनगर, वाळूज: वाळूज परिसरात घराच्या आडोशाने बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे दोन्ही मोठे अड्डे पोलिसांनी एका तासांच्या अंतराने धाड टाकून उद्धवस्त केले. मधुबन कॉलनी आणि साठेनगर या दोन्ही ठिकाणी मोठ्या कंपन्यांच्या गॅस टाक्यांचा साठा, बोगस पद्धतीने गॅस भरण्याची यंत्रणा, इलेट्रिक वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण १ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल वाळूज पोलिसांनी जप्त केला.

वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

गोविंद शेषराव भगत (३५, रा. मधुबन कॉलनी, कमळापूर रोड, वाळूज) आणि रसूल उर्फ फिरोज जहांगीर सय्यद (४२, रा. साठेनगर, वाळूज) अशी अवैध गॅस रिफिलिंग अड्डा चालविणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की, गोविंद भगत हा स्वतःच्या घरात मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून मशीनच्या साहाय्याने मोठ्या टाक्यांमधून छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरून विक्री करत आहे.

एका दिवसात दोन ठिकाणी छापे

एका दिवसात आणि अगदी एका तासात पोलिसांनी सलग दोन कारवाया करत वाळूज परिसरातील बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे जाळे उद्धवस्त केले. रहिवासी भागात चालणाऱ्या या धोकादायक धंद्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हा प्रकार उघडकीस आला.

हे देखील वाचा: Palghar Mob Lynching Case:पालघर साधु हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा भाजप प्रवेश; विरोधकांच्या आरोपानंतर प्रक्षप्रवेशाला स्थगिती

फिरोज सय्यदचा बेकायदेशीर धंदा उघड

पहिली कारवाई संपताच अवघ्या ४५ मिनिटांत, म्हणजेच ११.४५ वाजता, वाळूज पोलिसांना आणखी साठेनगरमधील रमूल उर्फ फिरोज हा त्याच्या घरात बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा धंदा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साठेनगरात रमूल उर्फ फिरोज याच्या घरावर छापा मारला. घरझडतीत एचपी, भारत गॅस, इंडेनचे भरलेले व रिकामे सिलेंडर, लोकल कंपनीचे छोटे सिलेंडर, इलेवट्रिक वजनकाटा, गॅस पंपिंग मोटर व पाईप, रेग्युलेटर असा सुमारे १८ हजार ६५० रुपयांचा ऐवज मिळाला.

मधुबन कॉलनीतील अड्ड्यावर कारवाई

माहिती आधारे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुबन कॉलनी येथे छापा टाकून भगतला ताब्यात घेतले.
घराची झडती घेतली असता जिन्यात एचपी, भारत, इंडेन, गो गॅस तसेच लोकल कंपन्यांचे ५० हून अधिक भरलेले व रिकामे सिलेंडर, गॅस पंपिंग मशीन, इलेक्ट्रक वजनकाटा, अडॅप्टर, पाईप इत्यादी साहित्य असा सुमारे ९८ हजार ५० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय शितोळे, अंमलदार डंगरे, पिंपळे, धुळे, सपकाळ, कटारे, खाकरे यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा: Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

Web Title: Illegal gas refilling busted in waluj cylinders and other items worth rs 116 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई
1

Mira Bhayander : धक्कादायक ! खुलेआमपणे अंमली पदार्थांचं सेवन ; समाजसेविका श्वेता पाटील यांची धडक कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा
2

Chhatrapati Sambhajinagar Weather: छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका वाढणार; हवामान खात्याचा इशारा

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
3

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
4

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.