crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पहिली कारवाई
पहिली कारवाई ही पुणे मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ करण्यात आली आहे. एका तरुणाला पिस्तुलासह पकडण्यात आले आहे. सोहम सागर शिंदे (२१, जांभुळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमच्या ताब्यात ७१ हजर रुपये किमतीची दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे विनापरवाना आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
दुसरी कारवाई
दुसरी कारवाई ही देहूरोडमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अरुण धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण हा पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. त्याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक राऊंड जप्त करण्यात आले आहे. देहुरोड पोलीस तपास करित आहेत.
तिसरी कारवाई
तिसरी कारवाई ही एका तरुणाने पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने १८ ऑगस्ट रोजी दुपारी दापोडी -सांगवी संगम क्रॉस रोडवरील श्री सूर्यमुखी महादेव मंदिराच्या रोडवर केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव राहुल संजय सरोदे (२३, जुनी सांगवी) असे आहे. पोलीस शिपाई विजय दौंडकर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याच्या ताब्यात ५० हजर रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल बेकायदेशीररित्या आढळले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
चौथी कारवाई
चौथी कारवाई ही १८ ऑगस्ट रोजी दुपारी म्हाळुंगे एमआयडीसी येथील येलवाडी गाव हद्दीत करण्यात आली. या प्रकरणात जितेंद्र राम धुमाळ (४०) याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र धुमाळ याच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल विनापरवाना व बेकायदेशीररित्या आढळले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
पाचवी कारवाई
पाचवी करावी ही १८ ऑगस्ट रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रतिक शंकर रसाळ (२१, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई दिपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक रसाळ हा ट्रान्सपोर्टनगर येथे शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन प्रतिक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५१ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी गावठी कट्टा आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.