Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीशी अनैतिक संबंधाचा संशय; मित्रानेच केले मित्रावर जीवेघणा हल्ला

दोघेही एकलहराकडे जात असताना सचिनने 'पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ' असे सांगून प्रभाकर यांना राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 04, 2026 | 11:07 AM
पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय; मित्रावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Follow Us
Follow Us:

नाशिक : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने आपल्याच जिवलग मित्राचा गळा चिरून आणि पोटात सुरा खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना एकलहरा जवळील राखेच्या खदाणीजवळ घडली. सुदैवाने, पीडित तरुणाने वार हाताने अडवल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, या झटापटीत त्याच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली गेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर नानाभाऊ साळवे (वय ४१, रा. श्रमिकनगर, ओझर) हे फेब्रिकेशनचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी सचिन उर्फ मुरलीधर सिताराम धोंडगे (रा. डोंगरेज, ता. सटाणा) हा त्यांचा मित्र आहे. १ मे रोजी दुपारी सचिनने प्रभाकर यांना फोन केला. ‘पत्नीला भेटायला एकलहरा येथे जायचे आहे, मला ओझरवरून पिकअप कर’ असे त्याने सांगितले. मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रभाकर रात्री ८ वाजता आपल्या दुचाकीने (एमएच १५ जेबी ४२०६) ओझरजवळ दहाव्या मैलावर पोहोचले. दोघेही एकलहराकडे जात असताना सचिनने ‘पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ’ असे सांगून प्रभाकर यांना राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले.

दरम्यान, रात्री ९.१५ च्या सुमारास सचिनने लघुशंकेचे बहाणे करून गाडी थांबवण्यास सांगितली. रस्ता निर्मनुष्य असल्याने प्रभाकर यांना शंका आली, त्यांनी गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करताच सचिनने बॅगेतून धारदार शस्त्र काढून थेट प्रभाकर यांच्या गळ्याला लावले.

सुदैवाने जीव वाचला; पोटावर कोयत्याने वार

दुचाकी घसरून दोघेही खाली पडले. संतापलेल्या सचिनने प्रभाकर यांच्या पोटावर जोरात वार केला, परंतु प्रभाकर यांनी प्रसंगावधान राखत तो वार हाताने पकडला. यामध्ये त्यांच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली गेली. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी तिथून पळ काढला आणि एका वाहनधारकाच्या मदतीने सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचून आपली सुटका करून घेतली. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात नेलं

जखमी प्रभाकर यांना तातडीने बिटको आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, फरार संशयित आरोपी सचिन धोंडगे याच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. या भीषण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Immoral relationship with wife man attack on friend incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • Attempt to Murder
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.