Amravati News: यंदाच्या खरीप हंगामात पावसातील खंडाचा परिणाम पिकांच्या वाढीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शेतीचा वाढता उत्पादन खर्च, कर्जाची परतफेड, घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
Amravati News: कृषीवर अवलंबून शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी तहसीलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ शनिवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे पोहोचली. गुरुकुंज आश्रमात यात्रेचे स्वागत करताना वृक्षारोपण, सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
Amravati News: जलाशयांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अमरावतीच्या मोर्शीत नगर परिषदेसमोर एका तरुणाच्या संशयास्पद हालचालींनी पोलिसांचे लक्ष वेधले. गुप्त माहितीच्या आधारे झडती घेतली असता त्याच्या कमरेत पिस्तूलसदृश अग्निशस्त्र सापडले आणि पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
Amravati News: उद्यानांच्या माध्यमातून ताडोबा परिसराची सांस्कृतिक ओळख आणि निसर्गाशी असलेले पारंपरिक नातेही जपण्याचा प्रयत्न आहे.स्थानिक शालेय विद्यार्थ्यांचा या क्लबमध्ये सहभाग असेल, उद्यानांची देखभाल, वृक्षांना पाणी देणे, स्वच्छता मोहिमा, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमंती आदी उपक्रमात विद्यार्थी सहभा...
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांचा एक युनिट म्हणून विचार केला जाणार आहे. वीज अरेस्टर उपकरणांची मानके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या निकषांनुसार असतील.
Amravati News: लहान खोल्यांमध्ये बालकांना बसविण्यासोबतच भोजन तयार करणे व अन्य उपक्रम राबविण्याची वेळ येते. काही ठिकाणी केंद्रांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते तसेच पुरेशा वाहतूक सुविधा नसल्याने अंगणवाडी सेविकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
जिल्ह्यात एकूण ७.५ लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या वाहनांवर ही नंबर प्लेट आढळणार नाही, त्यांच्यावर १ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे.
Amravati Newsग्रामीण भागातील अंगणवाड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मुलभूत सुविधांची कमतरता दूर करावी, सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीचे नियमित निरीक्षण करावे, बालकांना दर्जेदार पोषण आहार उपलब्ध करून द्यावा तसेच स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह, वीज आणि गॅसची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा नवीन नियम लागू होणार आहे.२०२४ मध्येच ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून जीपीएस आणि बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर कडक भूमिका घेत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी नवीन नियम लागू क...
Amravati News: डफरीन रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विद्युत विभागाकडून फायर ऑडिटची प्रक्रिया अपेक्षित वेळेत पूर्ण झाली नसल्याची माहितीही चौकशीत समोर आली होती.
Amravati News: गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ६३.९८ टक्के म्हणजेच १६३.९४ दलघमी पाणीसाठा होता. चंद्रभागा प्रकल्पात सर्वाधिक ८६.५१ टक्के, तर पूर्णा प्रकल्पात ८३.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. शाहनूरमध्ये ६१.८२ टक्के आणि सपनमध्ये ६४.२७टक्के जलसाठा आहे.