Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला; आजींची पोलीस ठाण्यात धाव

पुणे शहरात विधानसभा निवडणूकांची धामधुम सुरू असतानाच आजींचे ३ बोकड अन् १ शेळी चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या घटनेने पुण्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2024 | 02:05 PM
ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला; आजींची पोलीस ठाण्यात धाव

ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला; आजींची पोलीस ठाण्यात धाव

Follow Us
Follow Us:

पुणे/ अक्षय फाटक :  पुणे शहरात विधानसभा निवडणूकांची धामधुम सुरू असतानाच आजींचे ३ बोकड अन् १ शेळी चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या घटनेने पुण्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली आहे. आजींनी बोकड अन् शेळी न मिळाल्याने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली आहे. बोकड व शेळी चोरीची तक्रार देखील दिली आहे. आता पोलिसांनी घटनेच्या ७ दिवसानंतर या प्रकरणात बोकड व शेळी चोरीप्रकरणी गुन्हा नोंदवत शोध सुरू केला आहे.
याप्रकरणी ६२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञातांवर चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

पुण्यातील चोरटे स्मार्ट तर आहेतच पण दिवसेंदिवस हे चोरटे काय-काय चोरून नेतील याचाही भरोसा राहिलेला आहे. कधी ड्रायफूट तर कधी बर्फी-पेढा आणि ब्रँडेड कपडे देखील चोरून नेले जात असल्याच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. पण, ऐन निवडणूकीत बोकड व शेळी चोरीला गेल्याने या घटनेची शहरभर खमंग चर्चा सुरू झाली आहे.

हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात या आजी राहण्यास आहेत. त्यांच्या घराच्या परिसरात कॅनोलचा परिसर आहे. या कॅनोललगत त्यांनी त्यांचे तीन बोकड आणि १ शेळी १२ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे दोरीने बांधून ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्या सकाळी बोकड व शेळी सोडण्यास गेल्या असता त्यांना तेथे नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोधाशोध केली. पण ते मिळाले नाही. नंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. आता याप्रकरणात पोलिसांनी सात दिवसांनी गुन्हा नोंद केला आहे.

हे सुद्धा वाचा : जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यात नागरिकांना लुटले

पुणे शहरात एकट्या पादचारी नागरिकांना भावनिक करून त्यांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, एका ज्येष्ठ महिलेसह दोघांजवळील किंमती ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ६२ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गणेशमळा परिसरात राहायला आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिर परिसरातून त्या जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. महिलांना मोफत साडी आणि पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची बतावणी केली. तुमच्याकडील दागिने आणि रोकड काढून पिशवीत ठेवा, असे सांगितले. नंतर चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवत त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून पिशवीतील दागिने आणि रोकड असा ५५ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Web Title: In maharashtra election period accused stolen three buck and one goat hadapsar area pune crime news nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 02:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Election
  • Pune Crime

संबंधित बातम्या

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ
1

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी
2

Amravati News: कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवामध्ये लाऊडस्पीकर मर्यादेतच वाजवा! पुण्यातील बापटनंतर ठाण्यात डॉ. महेश बेडेकर यांची भूमिका

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
4

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.