Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Supply: चिपळूणकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार? कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी भास्कर जाधव सरसावले

Water Supply Scheme: चिपळूण शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याच्या १५२ कोटींच्या योजनेचा प्रश्न आता आमदार भास्करराव जाधव यांनी हाती घेतला आहे. योजनेसाठी शासनाकडून आतापर्यंत केवळ ४५ कोटी रुपये मिळाले असून, निधीअभावी नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडण्याची वेळ आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 04:19 PM
चिपळूणकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार? कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी भास्करराव जाधव सरसावले

चिपळूणकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार? कोळकेवाडी ग्रॅव्हिटी योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी भास्करराव जाधव सरसावले

Follow Us
Follow Us:
  • १५२ कोटींच्या पाणी योजनेसाठी आतापर्यंत मिळाले फक्त ४५ कोटी
  • नगरपरिषदेवर ठेवी मोडण्याची वेळ
  • चिपळूणच्या बहुचर्चित पाणी योजनेचा प्रश्न भास्करराव जाधवांच्या कोर्टात
चिपळूण : चिपळूण शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याच्या बहुचर्चित योजनेचा प्रश्न आता आमदार भास्करराव जाधव यांनी हाती घेतला आहे. या योजनेसाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने चिपळूण नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अस्वस्थ झालेल्या आमदार जाधव यांनी आज ( १८) चिपळूण येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. योजनेतील अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (Water Supply Scheme)

१५२ कोटींच्या योजनेसाठी आतापर्यंत केवळ ४५ कोटींचा निधी

नागरोत्थान योजनेअंतर्गत २०२४ मध्ये कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याच्या योजनेला १५२ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात आजपर्यंत शासनाकडून चिपळूण नगरपरिषदेला केवळ ४५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उपलब्ध निधीच्या जवळपास तेवढ्याच किमतीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. सध्या चिपळूण शहराला कोयनेच्या अवजलातून पाणी मिळत असून, त्यामुळे दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. मात्र, भविष्यातील पाण्याची गरज आणि दुष्काळी परिस्थितीचा धोका लक्षात घेता कोळकेवाडी धरणातून थेट ग्रॅव्हिटीने पाणी आणणे शहरासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

Robbery News: तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांचा हल्ला; चाकूचा धाक दाखवून लांबवले सोने आणि रोकड!

काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या कौन्सिल सभेत उपलब्ध ठेवींमधून पाच कोटी रुपये खर्च करण्याचे ठरल्याची माहिती आमदार भास्करराव जाधव यांना मिळाली. ज्या शहरात आपली जडणघडण झाली, त्या शहराचे आपण देणे लागतो, या भावनेतून त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.

विरोधी पक्षात असूनही शहराच्या प्रश्नासाठी पुढाकार

भास्करराव जाधव यांनी यापूर्वी नगरविकास राज्यमंत्री म्हणून काम करताना चिपळूण शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या वेळी चिपळूण शहर त्यांच्या मतदारसंघात नसतानाही त्यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. सध्या ते विरोधी पक्षात असले तरी संसदीय आयुधांचा वापर करून चिपळूण शहराच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवी मोडण्याची वेळ आल्याचे समजल्यानंतर त्यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली.

तीन विभागांमधील समन्वयाचा अभाव

या बैठकीला कोळकेवाडी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता महेश रासणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता योगेश नंजाप्पा, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित कांबळे आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव उपस्थित होते. याशिवाय योजनेशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक फैसल कास्कर, मिथिलेश उर्फ विकी नरळकर, कांचन शिंदे आणि अजय भालेकर यांचीही उपस्थिती होती.

आमदार जाधव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून योजनेचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी कोयना सिंचन विभाग, चिपळूण नगरपरिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तीन विभागांमध्ये एकमत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवून आणून ही योजना मार्गी लावणे आपल्यासाठी अवघड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१० टक्के लोकवर्गणी भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा

चिपळूण तालुका डोंगरी विकास योजनेमध्ये समाविष्ट असल्याने या पाणी योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी भरण्याची आवश्यकता नव्हती, असेही आमदार जाधव यांनी बैठकीत नमूद केले. त्यामुळे या योजनेच्या निधी आणि अंमलबजावणीसंदर्भातील नियमांची स्पष्टता करण्याची गरज असल्याचे समोर आले.

२७ गावांना योजनेत जोडण्यासाठीही केला होता पाठपुरावा

या पाणी योजनेला मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान चिपळूण शहराच्या योजनेत २७ गावांचा समावेश व्हावा, यासाठीही आमदार भास्करराव जाधव यांनी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नातून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात यश आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

या संपूर्ण योजनेचा आढावा घेतल्यानंतर आता संबंधित विभागांमधील समन्वय आणि निधीचा प्रश्न कसा मार्गी लागतो, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे. शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेला गती मिळणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिपळूणच्या कोळकेवाडी ग्रॅव्हिटी पाणी योजनेची किंमत किती आहे?

    Ans: या योजनेला २०२४ मध्ये नगरोत्थान योजनेतून १५२ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती.

  • Que: या योजनेसाठी शासनाकडून आतापर्यंत किती निधी मिळाला आहे?

    Ans: आतापर्यंत शासनाकडून चिपळूण नगरपरिषदेला ४५ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, तेवढ्याच किमतीचे कामही पूर्ण झाले आहे.

  • Que: आमदार भास्करराव जाधव यांनी बैठक का घेतली?

    Ans: योजनेसाठी निधी अपुरा मिळाल्याने नगरपरिषदेवर स्वतःच्या ठेवीमधून पाच कोटी रुपये खर्च करण्याची वेळ आल्याचे समजल्यानंतर जाधव यांनी योजनेतील अडचणी समजून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Web Title: Chiplun kolke wadi gravity water scheme bhaskar jadhav review meeting sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra
  • Water supply

संबंधित बातम्या

कास समितीमार्फत पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमधे पाणीपुरवठा सुरू; वन्यप्राण्यांची होणार सोय
1

कास समितीमार्फत पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमधे पाणीपुरवठा सुरू; वन्यप्राण्यांची होणार सोय

Chiplun नगरपरिषदेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येईना? नसबंदी सोडा आता थेट गळ्यात काठी बांधून…
2

Chiplun नगरपरिषदेला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येईना? नसबंदी सोडा आता थेट गळ्यात काठी बांधून…

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद
3

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा
4

Nagpur News: महाराष्ट्रात अद्ययावत ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार; रुग्णवाहिकेतच मिळणार ICU आणि डॉक्टरांची सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.