Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार? डिसेंबरचा पगार देण्यासाठी १६५ कोटींची तूट; कर्मचारी काँग्रेसची सरकारकडे मागणी

ST Employees: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वेतन आणि संबंधित देणी भागवण्यासाठी ५५५.९५ कोटी रुपयांची आवश्यकता असताना सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या निधीत केवळ ३९१ कोटी रुपये शिल्लक आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2026 | 11:12 AM
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार? डिसेंबरचा पगार देण्यासाठी १६५ कोटींची तूट; कर्मचारी काँग्रेसची सरकारकडे मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडणार? डिसेंबरचा पगार देण्यासाठी १६५ कोटींची तूट; कर्मचारी काँग्रेसची सरकारकडे मागणी

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या डिसेंबरच्या वेतनावर टांगती तलवार!
  • १६५ कोटींचा निधी कमी पडण्याची शक्यता
  • सरकारने तातडीने निधी द्यावा; श्रीरंग बरगे यांची मागणी
ST Employees: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्याचे वेतन देण्यासाठी सुमारे १६५ कोटी रुपयांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये तातडीने आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. (ST Employees)

३,६७८ कोटी रुपयांची तरतूद

राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात एसटीच्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीसाठी ३,६७८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी केवळ ३९१ कोटी रुपये शिल्लक आहेत. दुसरीकडे, महामंडळाला एका महिन्याचे वेतन आणि त्यासंबंधित देणी भागवण्यासाठी ५५५.९५ कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यामुळे डिसेंबरचे वेतन वेळेवर देण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे बरगे यांनी म्हटले आहे.

Diwali Special Bus Service: दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल

महामंडळाच्या वेतनावरील खर्चात मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे आणि इतर भत्त्यांसह भविष्य निर्वाह निधी व उपदान निधीतील नियोक्त्याचे अंशदान तसेच वेतन फरकाचा हप्ता यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ झाल्याने महामंडळावर दरमहा ४.९० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.

एसटी महामंडळात ८३ हजारांहून अधिक कर्मचारी असून, त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह वेतनावर अवलंबून आहे. वेतनास विलंब झाल्यास घरभाडे, मुलांचे शैक्षणिक शुल्क आणि कर्जाचे हप्ते भरण्यात अडचणी निर्माण होतील, असे बरगे यांनी सांगितले.

दुष्काळात तेरावा महिना!

दरम्यान, राष्ट्रीय सामायिक वाहतूक कार्ड (एनसीएमसी) स्मार्ट कार्डची सक्ती केल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात एसटीला मिळालेली सवलत मूल्य प्रतिपूर्तीची रक्कम घटून ३०५ कोटी रुपयांवर आली असून गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी आकडा असून “दुष्काळात तेरावा महिना” अशी गत झाली असल्याची टीकाही बरगे यांनी केली.

महामंडळाची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने भविष्य निर्वाह निधी, उपदान, व इतर रक्कमा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात येऊन सुद्धा त्या संबंधित संस्थांना भरणा करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना निव्वळ वेतन दिले जात असून सवलत मूल्य प्रतिपूर्तीतील घट आणि वाढता खर्च यामुळे महामंडळावरील आर्थिक ताण आणखी वाढला आहे. त्यामुळे पुरवणी मागण्यांमध्ये भरीव तरतूद करून निधीची रक्कम एसटीच्या खात्यात आगाऊ जमा करण्यात यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली.

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी किती निधी आवश्यक आहे?

    Ans: एसटी महामंडळाला एका महिन्याचे वेतन आणि संबंधित देणी भागवण्यासाठी ५५५.९५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

  • Que: एसटी महामंडळाच्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती निधीत किती रक्कम शिल्लक आहे?

    Ans: २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ३,६७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी आता केवळ ३९१ कोटी रुपये शिल्लक आहेत.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी काय मागणी करण्यात आली आहे?

    Ans: कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे यासाठी राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये तातडीने आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

Web Title: Maharashtra st employees salary december 165 crore fund shortage sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • st bus
  • ST Employees

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार
1

पिंपरी-चिंचवडकरांची प्रतीक्षा संपणार! मार्चपासून भामा-आसखेडचे 167 एमएलडी पाणी मिळणार

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक
2

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक

Diwali Special Bus Service: दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल
3

Diwali Special Bus Service: दिवाळीत लालपरीची तुफान कमाई! अवघ्या १६ दिवसांत एसटीच्या तिजोरीत ५४८ कोटींचा महसूल

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन
4

ST Tirthatan Yojna: एसटीच्या ‘संगे तीर्थाटन’ योजनेतून देवदर्शनासह पर्यटनाची संधी; नोव्हेंबरमध्ये विशेष सहलींचे नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.