Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक! महिलेच्या गळ्याला तलवार लावून चोरीचा प्रयत्न; शिरुरमधील घटना

शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी मध्ये घरात बसलेल्या महिलेच्या गळ्याला तलवार लावून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 06, 2025 | 03:04 PM
खळबळजनक! महिलेच्या गळ्याला तलवार लावून चोरीचा प्रयत्न; शिरुरमधील घटना

खळबळजनक! महिलेच्या गळ्याला तलवार लावून चोरीचा प्रयत्न; शिरुरमधील घटना

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी मध्ये घरात बसलेल्या महिलेच्या गळ्याला तलवार लावून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात तीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या हिराबाई वाखारे या सायंकाळच्या सुमारास घरात असताना तीन अज्ञात युवक घरामध्ये आले त्यांनी हिराबाई यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला, दरम्यान हिराबाई यांनी आरडाओरडा केल्याने घरात आलेले तिघेजण पळून गेले, मात्र घडलेल्या घटनेने स्टेट बँक कॉलनी सह परिसरात खळबळ उडाली.

याबाबत रेखा शिवाजी वाखारे (वय ४४ वर्षे रा. स्टेट बँक कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : ‘तो’ पोलिस कर्मचारी अवैध व्यवसायिकांचा खबऱ्या? नागरिक संतापले

महिलांकडील मोबाइल लंपास

पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसाखाली प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.

Web Title: In shirur an attempted theft by putting a sword on a womans neck has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

बापरे! कोलकातातील कॉलेज युनियन रूममध्ये सापडल्या वाळवीने कुरतडलेल्या नोटा; किंमत तब्बल लाखांमध्ये…
1

बापरे! कोलकातातील कॉलेज युनियन रूममध्ये सापडल्या वाळवीने कुरतडलेल्या नोटा; किंमत तब्बल लाखांमध्ये…

Matheran News : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी माथेरान सज्ज! पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग; नगराध्यक्ष स्वतः मैदानात
2

Matheran News : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी माथेरान सज्ज! पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग; नगराध्यक्ष स्वतः मैदानात

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे  गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
3

Vidhan Parishad Election 2026: शिंदे गटाचे गोपीकिशन व विप्लव बाजोरियांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर
4

पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.