ॲट्रॉसिटी प्रकरणाच्या तपासात दिरंगाई भोवली; पोलिस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली (संग्रहित फोटो)
शिरवळ/जिवन सोनावणे : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असते. मात्र, खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलिस ठाण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसच अवैध व्यावसायिकांचे खबऱ्या बनत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे, ज्यामुळे पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
वाठार कॉलनी येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एका नागरिकाने डायल ११२ वर तक्रार केली, परंतु पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल एक तास घेतला. या दरम्यान, व्यावसायिकांनी आपले बस्तान हलवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांशी व्यावसायिकांचा असा समन्वय नागरिकांना खटकत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे.
तक्रारदाराचे नाव व्यावसायिकांपर्यंत पोहोचले? सर्वात गंभीर बाब म्हणजे, तक्रारदाराचा तपशील थेट व्यावसायिकांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. यामुळे तक्रार करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसच अशा प्रकारे गोपनीय माहिती लीक करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
वाठार कॉलनी – अवैध व्यवसायांचे केंद्र
वाठार कॉलनी हे ‘अवैध व्यवसायांचे हब’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. काही पोलिस अधिकारी कर्मचारी थेट व्यावसायिकांना सहकार्य करत असल्याचे आरोप होत आहेत. अशा घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या नैतिक कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे सुद्धा वाचा : बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन महिलांना गंडवले; बिहारच्या टोळीचा पर्दाफाश
नागरिकांचा संताप आणि कारवाईची मागणी
लोणंद परिसरातील जागरूक नागरिकांनी पोलिसांवरील नाराजी व्यक्त करत दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. जर पोलिसच अवैध व्यावसायिकांना संरक्षण देत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यायची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पुणे शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असताना गेल्या काही दिवसाखाली धनकवडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून तब्बल दहा जणांना पकडले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, २२ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जप्त केले आहे. हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असताना सहकारनगर पोलिसांचा त्याकडे कानाडोळा असल्याचे दिसून येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या आहेत. त्यानंतरही हे अवैध धंदे सुरू आहेत. त्याला स्थानिक पोलिसांचे छुपे पाठबळ मिळत असल्याचे देखील दिसते.