Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर; पोलिसांवरही केले गंभीर आरोप

भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2025 | 12:00 PM
प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर; पोलिसांवरही केले गंभीर आरोप

प्रसिद्ध उद्योगपतीने उघड केलं पत्नीचं अफेअर; पोलिसांवरही केले गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

पती-पत्नीच्या अनेक कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशीच एक कथा रिपलिंगचे संस्थापक प्रसन्न शंकर यांची आहे. सोशल मीडियावर त्याने पत्नी आणि चेन्नई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. भारतीय उद्योजक आणि रिपलिंगचा सह-संस्थापक प्रसन्न शंकर याने आपली पत्नी दिव्या शशीधरवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं उघड करत त्याचे पुरावेही एक्सवर शेअर केले आहेत. तसंच चेन्नई पोलीस दिव्या शशिधरच्या बाजूने असून, आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही केला आहे.

मी सध्या चेन्नई पोलिसांपासून पळ काढत असून तामिळनाडूच्या बाहेर असल्याचं त्याने सांगितलं आहे. तर दुसरीकडे दिव्या शशिधरने प्रसन्नावर “लैंगिक विकृती” आणि “अपहरण” केल्याचा आरोप केला आहे. प्रसन्ना शंकरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाला 10 वर्षं झाली असून, त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आहे. दिव्याचे अमेरिकेत सहा महिन्यांपासून अनुप नावाच्या व्यक्तीसोबत सहापेक्षा जास्त महिन्यांपासून प्रेमसंबंध होते आणि प्रियकराच्या पत्नीने त्याला मेसेज केल्यानंतर त्याला हे कळले.

पोस्टमध्ये म्हटले आहे की, “त्यानंतर आम्ही आमच्या घटस्फोटाच्या रकमेसाठी तिला किती रक्कम द्यावी लागेल या अटींवर वाटाघाटी करत होतो. ती यावर आनंदी नव्हती. तिने माझ्याविरुद्ध मारहाण केल्याची खोटी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिने आणखी खोट्या तक्रारी केल्या की मी तिच्यावर बलात्कार केला, तिचे नग्न व्हिडिओ प्रसारित केले. सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आहे, ते निराधार असल्याचे आढळले आहे आणि मला सर्व आरोपांमधून मुक्त केलं आहे”.

“मी भारतात घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटातून अधिक पैसे कमवण्यासाठी तिने अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर तिने तिच्या घटस्फोटाच्या खटल्यात मदत करण्यासाठी माझ्या मुलाला अमेरिकेत पळवून नेले. मी अमेरिकेत आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला आणि न्यायाधीशांनी माझ्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला परत करण्यास सांगितलं”, अशी माहिती पोस्टमधून दिली आहे.

दिव्याने त्यांच्या मुलाला अमेरिकेत पळवून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने अमेरिकेतील न्यायालयांमध्ये जाऊन तिला थांबवलं असंही त्याने सांगितलं आहे. मुलाचा समान ताबा देण्यावर सहमती दर्शवली असली तरी तिने मुलाचा पासपोर्ट सादर केला नाही आणि त्याऐवजी त्याच्याविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली असा आरोपही त्याने केला आहे. शंकरने एक्सवर त्याच्या मुलासोबतचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. पोलीस आणि माझी पत्नी संयुक्त पत्रकार परिषद घेत माझ्यावर अनेक आरोप करणार आहेत असा दावा त्याने केला आहे. तसंच त्यांनी माझा मित्र गोकुळला माझे सर्व ट्विट खोटे असल्याचं सांगण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला आहे.

दिव्याने आरोप फेटाळून लावले

दरम्यान दिव्याने हे आरोप फेटाळून लावले असून शंकर हा ‘लैंगिक विकृत’ असल्याचा आरोप केला आहे. वेश्याव्यवसायाला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर शंकरला अमेरिकेत नोकरी गमवावी लागली असा आरोप दिव्याने केला आहे. शंकर हा एक ‘लैंगिक विकृत’ असून त्याने गुप्त कॅमेऱ्यांचा वापर करून महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले असा तिचा आरोप आहे. तिने तिच्या सासऱ्यांवरही लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अमेरिकन दूतावास आणि चेन्नई पोलिस तिच्या मुलाला शोधण्यात तिला मदत करत आहेत अशी माहिती तिने दिली आहे.

Web Title: Information has emerged that a famous businessman has revealed his wifes affair nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Chennai Police
  • crime news
  • Police News

संबंधित बातम्या

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू
1

Satara News :गोडोली हादरले! कौटुंबिक वादातून वडिलांचा मुलीवर बॅटने हल्ला; उपचाराआधीच मृत्यू

Chennai Accident : चेन्नईत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू? शनिवारपासून होते गायब
2

Chennai Accident : चेन्नईत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू? शनिवारपासून होते गायब

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
3

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!
4

Crime News: मालमत्तेसाठी आधी सासरच्यांना मारहाण; सुटकेनंतर दोनच दिवसांत पत्नीची भररस्त्यात हत्या!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.