Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये अमानुष कौटुंबिक हिंसाचार; मुलांच्या भांडणातून पेटला संताप, विवाहितेला तापत्या लोखंडी गजाने चटके

बीड जिल्ह्यातील बर्दापूर गावात मुलांच्या किरकोळ भांडणात हस्तक्षेप केल्याने विवाहितेवर पती, सासू व सासऱ्यांनी अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. तापत्या लोखंडी गजाने चटके देत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 17, 2026 | 12:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुलांच्या भांडणातून संताप; विवाहितेवर घरच्यांचा हिंसाचार
  • पतीने तापत्या लोखंडी गजाने पाच ठिकाणी चटके दिल्याचा आरोप
  • पती, सासू, सासऱ्यांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका विवाहितेवर अमानुष अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मुलांमधील किरकोळ भांडण थांबवण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या विवाहितेचा पती, सासू आणि सासऱ्याने मिळून अमानवी छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेचे नाव अश्विनी शहाजी मोरे (वय 23) असे आहे.

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

काय नेमकं प्रकरण?

घरात कपडे धुण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अश्विनीचा मुलगा शिवांश आणि दिराचा मुलगा सुरज यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. त्यावेळी सासरे मोहन साधू मोरे यांनी थेट शिवांशला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे बघून अश्विनीने त्यांना जाब विचारलं तर तिच्यावरच संताप व्यक्त करण्यात आला. पती शहाजी मोहन मोरे याने अश्विनीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली.

गरम गजाचे चटके

या हिंसाचारात सासू विजयमाला हिने गरम केलेला लोखंडी गज पतीच्या हातात दिला आणि त्याच तापलेल्या लोखंडी गजाने पतीने अश्विनीच्या डाव्या पायाच्या पोटरीवर तसेच हातावर एकूण पाच ठिकाणी चटके दिले. एवढेच नाही तर, सासऱ्याने “हिला जिवंत पेटवून द्या” असे देखील म्हंटले. अश्विनी यात गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जाण्यापासून रोखण्यात आले.

गुन्हा दाखल

त्यानंतर तिने कसे तसे करत आपल्या वडिलांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर तिने बर्दापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 118, 115 (2), 351 (2) व 3 (5) अन्वये पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

 

Gondia News: १११९ वाहनचालकांवर आकारला लाखोंचा दंड, ‘सिग्नल जम्प’च्या नावावर केली दंडात्मक कारवा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे व कधी घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील बर्दापूर गावात 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी.

  • Que: अत्याचाराचा आरोप कोणावर आहे?

    Ans: पीडितेचा पती, सासू आणि सासरा.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Inhuman domestic violence in beed anger flared up over a childrens quarrel married woman branded with a hot iron rod

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला
1

Belgaum crime: विधवा मुलीच्या पैशांवर डोळा? प्रेमसंबंधाच्या संशयातून अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…
2

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त
3

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू
4

Thane : धक्कादायक! पक्ष्याचा जीव वाचवताना जवानाचा जागीच गेला जीव; शॉक लागून एकाचा झाला मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.