Gondia News: १११९ वाहनचालकांवर आकारला लाखोंचा दंड, ‘सिग्नल जम्प’च्या नावावर केली दंडात्मक कारवा
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणातील विधवा मुलीचे नाव शुभांगी आहे. शुभांगीचा विवाह लष्करी जवानाशी झाला होता. सेवा बजावताना जवानाचा मृत्यू झाल्यानंतर मोठी रक्कम शुभांगी यांना मिळाली होती. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या व आईच्या नावे संयुक्त बँक खात्यात ठेवली होती. या प्रकरणातील जखमींचा नाव योगेश जालिंदर चौधरी (वय 39, रा. संपगाव, बैलहोंगल, जि. बेळगाव) असे आहे. त्याचा देखील विवाहानंतर तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे योगेश देखील दुसऱ्या लग्नाचा विचार करत होता.
पाळत ठेवत हल्ला
पाच महिन्यांपूर्वी योगेशचा संपर्क शुभांगीशी झाला. त्यांनतर तुला दोघांमध्ये प्रेम झाले. त्यांनी लग्नाचा विचार सुरु केला. यावेळी आपल्या नावावरील रक्कम आपल्याला परत द्यावी, असा हट्ट शुभांगीने आई-वडिलांकडे धरला होता. आपल्या मुलीला फशी पाडून योगेश हाच शुभांगीकडील रक्कम मागत असल्याचा राग शुभांगीच्या वडिलांना होता. यामुळे त्यांनी योगेश याच्यावर पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री योगेश हा क्लब रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. यावेळी चार संशयितांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो जेवण करून बाहेर पडताना त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
आरोपी अटकेत
या मारहाणीत योगेश हा गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली. नामदेव पाटील, त्यांचा मुलगा संदेश पाटील, जावई संदीप वरपे आणि नारायण झेंडे (चौघे रा. बेळगाव) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
Ans: विधवा मुलीच्या नावावरील पैशांवरून संशय आणि राग.
Ans: क्लब रोडवर, लोखंडी रॉडने पाळत ठेवून मारहाण करण्यात आली.
Ans: चौघा आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले.






