Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी… अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड

इंस्टाग्रामवर सुरू झालेली मैत्री हळूहळू भेटीगाठीपर्यंत पोहोचली आणि सर्वेशला या नात्यामागे दडलेला घातपाताचा कट कळलाच नाही. गणेशोत्सवाच्या बहाण्याने त्याला निर्जनस्थळी नेण्यात आले आणि काही वेळातच त्याचा निर्घृण खून करण्यात आला. वर्षभरापूर्वीच्या वादाचा हा क्रूर बदला असल्याचे तपासात समोर येत असून, या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 06, 2026 | 02:29 PM
Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी... अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड

Crime News: इंस्टाग्रामवर मैत्री, मग भेटीगाठी... अन् निर्जनस्थळी तरुणाची हत्या; वर्षभराचा सूड उघड

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्रामवरून मैत्री करून सर्वेशला जाळ्यात ओढले
  • खानपूरमध्ये अपहरण करून धारदार शस्त्रांनी हत्या
  • चार आरोपी अटकेत; महिला आरोपी फरार
 

बेळगाव: वर्षभरापूर्वी झालेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने महिला मित्राच्या मदतीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर भेटीगाठी वाढवून संबंधित तरुणाला निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे आरोपींनी त्याचे अपहरण करून धारदार शस्त्रांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सर्वेश कांगरालाकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वर्षभरापूर्वी चाकूहल्ला; मनात होता सूड

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी जमिनीवर शेड बांधण्याच्या वादातून सर्वेशने मुख्य आरोपी शशि जलगडकर याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात शशि गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर बरा झाल्यानंतर त्याने सर्वेशच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी सर्वेशला संपवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ

इंस्टाग्रामवरून मैत्री; हॉटेल-पार्कमध्ये भेटी

सर्वेशला जाळ्यात ओढण्यासाठी शशिने आपल्या एका मित्राच्या गर्लफ्रेंडची मदत घेतल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीला सर्वेशशी इंस्टाग्रामवर मैत्री करण्यास सांगण्यात आले. दोघांमध्ये संवाद वाढल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही घेतले. सर्वेशचा त्या तरुणीवर विश्वास बसल्यानंतर दोघांच्या हॉटेल आणि पार्कमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या.

गणेशोत्सवाच्या बहाण्याने खानपूरला नेले

दरम्यान, २० सप्टेंबर रोजी आरोपी महिलेने गणेशोत्सव आणि फिरण्याच्या बहाण्याने सर्वेशला खानपूरच्या दिशेने नेल्याचा आरोप आहे. दोघेही एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा पाठलाग करणाऱ्या आरोपींनी सर्वेशला अडवले. त्यानंतर त्याचे अपहरण करून धारदार शस्त्रांनी त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हत्या केल्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकला

हत्येनंतर सर्वेशचा मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी तो खानपूर येथील मालप्रभा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर सर्व आरोपी आणि संबंधित महिला तेथून निघून गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नियोजनपूर्वक हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करताना घडली घटना; लोणावळा शहर पोलिसांकडून तपास सुरू

रात्री घरी न परतल्याने वडिलांची तक्रार

घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सर्वेश घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी माल मारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली.

चार आरोपी अटकेत; महिला आरोपी फरार

तांत्रिक तपासातून पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली. शशि जलगडकर (३३), राहुल जलगडकर (३०), दशरथ राजपूत (२३) आणि अरुण हुलोली (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वेशला कथितपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला निर्जनस्थळी घेऊन जाणारी महिला सध्या फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, या हत्येमागील नेमके नियोजन, सर्व आरोपींची भूमिका, हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे तसेच फरार महिला आरोपीचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Instagram love trap sarvesh kangralakar murder khanapur sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Instagram News
  • Love Crime

संबंधित बातम्या

अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ
1

अपघाताच्या पडद्याआड हत्येचा डाव? तेजिंदर मृत्यूप्रकरणात मैत्रिणीला अटक; ‘सुपारी’च्या चर्चेने खळबळ

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी
2

जळगावच्या लोंणजे गावातील घटनेने खळबळ; छेडछाडीवरून दोन गट भिडले; लाठ्या-काठ्यांनी तुफान हाणामारी

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर  म्हणाला …
3

Crime News: नशेत वाद अन् मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू; रक्ताचे कपडे बदलले अन् पोलिसांसमोर म्हणाला …

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू
4

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.