Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आता पोलीस ‘AI’ अन् Gate Analysis च्या मदतीने उघड करणार गुपिते!

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 03:16 PM
केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आता पोलीस 'AI' अन् Gate Analysis च्या मदतीने उघड करणार गुपिते!

केतन अग्रवाल हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आता पोलीस 'AI' अन् Gate Analysis च्या मदतीने उघड करणार गुपिते!

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर उद्योजक केतन अग्रवाल याचा दरीत पडून झालेला मृत्यू सध्या चर्चेचा विषय आहे. देशभरात या प्रकरणावर चर्चा होत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासेही समोर येत आहेत. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केतनला संपवण्याचा कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तपास यंत्रणा आता ‘गेट ॲनालिसिस’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत.

 

काय आहे पोलिसांचा ‘गेट ॲनालिसिस’ प्लॅन?

लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती हुडीने चेहरा झाकून चालताना दिसत आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आरोपी चेतन चौधरीच आहे, हे सिद्ध करण्यासाठी पोलीस आता ‘गेट ॲनालिसिस’ (चालण्याच्या पद्धतीची न्यायवैद्यक तपासणी) करणार आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तीच्या चालण्याचा पॅटर्न आणि चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची फॉरेन्सिक तुलना केली जाईल. यासाठी पोलीस चेतनला तशाच प्रकारची ‘हुडी’ घालून त्याच परिसरातून चालण्यास सांगणार असून त्याचे रेकॉर्डिंग केले जाईल.

‘गेट ॲनालिसिस’ तंत्रज्ञान कसे काम करते?

‘गेट ॲनालिसिस’ (चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण) हा एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास आहे. यात केवळ टाकलेल्या पावलांचेच नव्हे, तर शरीराच्या संपूर्ण हालचालींचे विश्लेषण केले जाते. तज्ज्ञ यामध्ये २० हून अधिक घटकांचे परीक्षण करतात; ज्यामध्ये पाऊल टाकतानाचे अंतर चालण्याचा वेग, हातांची हालचाल आणि जमिनीवर पाऊल पडण्याची पद्धत यांचा समावेश असतो. तपास यंत्रणा सीसीटीव्ही फुटेजचे ‘फ्रेम-बाय-फ्रेम’ (प्रत्येक फ्रेमचे) विश्लेषण करतात.

हत्येपूर्वी केली होती लोहगडाची ‘रेकी’

सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी न्यायालयात धक्कादायक खुलासा केला. केतनला ज्या विशिष्ट ठिकाणावरून खाली ढकलले जाऊ शकत होते, त्या जागेची पाहणी (रेकी) करण्यासाठी सिया आणि चेतन या दोघांनी हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याला भेट दिली होती. हा संपूर्ण कट रचण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटले होते, ज्याचा सविस्तर तपास अद्याप बाकी आहे.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

३ महत्त्वाच्या गोष्टींचा शोध सुरु

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की तपासाचे अनेक पैलू अद्याप बाकी आहेत, ज्यामध्ये: १) किल्ल्यावरील हत्येचे नेमकं ठिकाण निश्चित करणे. २) आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केलेला डिजिटल पुरावा हस्तगत करणे. ३) मृत केतन अग्रवाल याचा हरवलेला पासपोर्ट शोधून काढणे. १८ जून रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा संपूर्ण छडा लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांवर विशेष भर देत आहेत.

Web Title: Investigative agencies are now set to use gait analysis technology to solve the ketan agarwal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.