
crime (फोटो सौजन्य: social media)
बोईसर मधील रिच टू मनी या कंपनीचे संचालक रोशन जैन याने नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करून त्यावर मासिक तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत करोडो रुपये गोळा केले होते. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या नागरिकांना त्याने जाहीर केल्याप्रमाणे व्याज दिले, मात्र त्यानंतर तो व्याज देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळे रिच टू मनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याच्या विरोधात १४ नागरिकांनी पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली असून जवळपास दोन कोटी ३९ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
अनेक नागरिकांनी बँका आणि खाजगी वित्त संस्थाकडून कर्ज काढून आकर्षक व्याजाच्या आमिषाने लाखो रुपयांची रिच टू मनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर रोशन जैन याच्याविरोधात बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी इतर नागरिकांची देखील फसवणूक झाल्याची शक्यता असून पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गणेश शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक धनराज शिरसाट हे अधिक तपास करीत आहेत. बोईसर परिसरात यापूर्वी दिपांकर इन्व्हेस्टमेंट या कंपनीने देखील नागरिकांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवत करोडो रुपयांचा गंडा घातला होता.
दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
पालघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोकभारती संस्थेच्या भरती अकादमी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीने मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने क्रीडा स्पर्धेत तिसरा पदक पटकावला मात्र क्षणाधार्त आयुष्य संपवल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.
Ans: आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून नागरिकांकडून गुंतवणूक स्वीकारण्यात आली; सुरुवातीला व्याज देऊन नंतर पैसे व परतावा थांबवण्यात आला.
Ans: रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याने सुमारे 2 कोटी 39 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे.
Ans: आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असून आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे का, याचा शोध घेतला जात आहे.