नेमकं काय घडलं?
दि. २९ डिसेंबर रोजी अमनसिंग हा गाडी घेऊन घरातून गेला. मात्र तो परत आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने दि. ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर मुलाच्या मोबाईलचा सीडीआर व लोकेशन तपासायला सुरुवात केली. तेव्हा अमनसिंगचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. तेव्हा आरोपींनी अमनसिंगला उत्तमनगर परिसरात नेले. त्याच्याशी जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हे बेळगाव येथील असल्याचे कळल्यावर त्यांनी कर्नाटकात आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले. त्यानंतर खेडशिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने वार करून त्याच्या खूनाची कबुली दिली. आरोपीचं नाव प्रथमेश चिंधू आढळ, वय १९ वर्षे, रा. उत्तमनगर पुणे, नागेश बालाजी धबाले, वय १९ वर्षे, रा. शिवणे, पुणे असे आहे. हे दोघेही विधीसंघर्षित बालक आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला
Ans: अमनसिंग सुरेंद्रसिंह गच्चड (वय 17), रा. विश्रांतवाडी, पुणे
Ans: जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अमनसिंगचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
Ans: दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






