Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेचा आणखी एक प्रकार समोर; प्रेमाच्या नावाखाली IT इंजिनीअरची २२ लाखांची फसवणूक

इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेने प्रेमाच्या नावाखाली भांडुपमधील IT इंजिनीअर तरुणीची २२ लाखांची फसवणूक केली. लग्नाचे आश्वासन, BMW कारचे स्वप्न आणि विविध कारणांनी पैसे उकळले. भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 01:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेवर नवीन फसवणुकीचा आरोप
  • IT इंजिनीअर तरुणीची २२ लाखांची फसवणूक
  • लग्नाचे व BMW कारचे स्वप्न दाखवून पैसे उकळले
मुंबई: मुंबईतील सोशल मीडिया ‘रील्स स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैलेश रामगुडे (३१) याच्या फसवणुकीचे नवे प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील पोलिसांनी अनेक तरुणींना प्रेमाच्या नावाखाली लाखो रुपये लाटल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्याच्याकडून 37 लाखांचे दागिने, 1 कोटी किंमतीची BMW कार आणि चार आयफोन जप्त करण्यात आले होते. आता भांडुपमधील IT इंजिनीअर मुलीची तब्बल २२ लाखांची फसवणूक केल्याचेही उघड झाले असून भांडुप पोलिसांनी त्याच्यावर नवीन गुन्हा नोंदवला आहे.

सक्षम ताटेनंतर आणखी एक भयंकर हत्याकांड; भररस्त्यात चाकूने भोसकून तरुणाची हत्या

नेमकं घडलं काय?

भांडुपमधील ३० वर्षीय पीडित तरुणीची जानेवारी २०२३ मध्ये इंस्टाग्रामवरून शैलेशशी ओळख झाली. लाखो फॉलोवर्स आणि हायप्रोफाईल जीवनशैली पाहून ती त्याच्या प्रभावाखाली गेली. लवकरच त्याने तिच्याशी फोनवर बोलणे सुरू केले आणि प्रेम व्यक्त केले. फेब्रुवारी २०२३ मध्ये वाशी येथे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यानंतरच्या भेटींमध्ये त्याने लग्नाची मागणी करत तिच्या आईशीही चर्चा केली. यामुळे मुलीचा विश्वास आणखीनच वाढला.

शैलेशने फोटोशूटसाठी पैसे हवे असल्याचे सांगत सुरुवातीला दीड लाख रुपये घेतले. नंतर तिला BMW कार घेण्याचे स्वप्न दाखवत तिच्याच नावाने कार बुक केली आणि डाउन पेमेंट, टोकन मनी, डीलरला एनईएफटी अशा मिळून सुमारे ९ लाख रुपये घेतले. पुढे वडिलांचे आजारपण, नवीन कंपनी सुरू केल्याचे कारण देत त्याने पुन्हा पुन्हा पैसे मागितले.

फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुलीने त्याला एकूण २७ लाख रुपये दिले. त्यापैकी फक्त ५ लाख परत केले. दरम्यान, ठाण्यात दुसऱ्या मुलीने फसवणुकीची तक्रार केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. जेलमधून बाहेर आल्यानंतरही त्याने लग्नाच्या बहाण्याने मुलीची दिशाभूल सुरू ठेवली.

ती भांडुप पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोहोचताच शैलेशने ३ लाख रुपये परत दिले, मात्र उर्वरित रकमेबाबत टाळाटाळ केली आणि गायब झाला. नोव्हेंबरमध्ये विष्णूनगर पोलिसांनी त्याला दुसऱ्या प्रकरणात अटक केली. याची माहिती मिळताच पीडित तरुणीनेही तक्रार दाखल केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.

सोनसाखळी हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचा ऐवज जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: शैलेश रामगुडेवर नवीन आरोप काय आहे?

    Ans: IT इंजिनीअर मुलीची प्रेमाच्या नावाखाली २२ लाखांची फसवणूक केल्याचा आरो

  • Que: पैसे कसे उकळले गेले?

    Ans: फोटोशूट, BMW कार बुकिंग, वडिलांचे आजारपण व नवीन कंपनी अशा कारणांनी पैसे घेतले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून शैलेश न्यायालयीन कोठडीत आहे.

Web Title: It engineer cheated of rs 22 lakhs in the name of love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक
1

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;
2

Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली;

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी
3

Wardha Crime: मानसिक रुग्णाचा नग्नावस्थेत तांडव; दंडुक्याच्या हल्ल्यात दोन ठार, पोलिसासह चौघे जखमी

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…
4

Gadchiroli Crime: मित्रानेच केला घात! सोन्याच्या चैनसाठी आरडी एजंटची दारू पाजून सत्तूरने निर्घृण हत्या; आधी दारू पाजली, नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.