Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: सहा महिने दडवलेलं रहस्य उघड! रामटेकमध्ये ढाब्याच्या आवारातून आचाऱ्याचा सांगाडा बाहेर; धक्कादायक प्रकरण समोर

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका ढाब्यावर काम करणाऱ्या आचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांपासून लपवण्यासाठी जमिनीत गाडण्यात आला होता. उत्खनन करून सांगाडा बाहेर काढला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 01:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रामटेक तालुक्यातील नवरगाव येथील ढाब्यावर आचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू.
  • मृतदेह पोलिसांना न कळवता ढाब्याच्या आवारात जमिनीत गाडला.
  • गुप्त माहितीवरून पोलिसांनी उत्खनन करून सांगाडा बाहेर काढला.
नागपूर: नागपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर एका हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मृत्यू झालेल्या प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर असे नाव आहे. तो आचारी म्हणून ढाब्यावर काम करत होता. त्याचा मृत्यू झाल्यांनतर ही बाब पोलिसांपासून लपवण्यासाठी त्याचा मृतदेह ढाब्याच्या आवारातच जमिनीत गाडण्यात आला होता. या प्रकरणाची गुप्त माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित ठिकाणी उत्खनन केले. पोलिसांनी या कारवाईत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हाती लागला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Jalna Crime: लग्नाचे आमिष, अत्याचार आणि चार महिन्यांची गर्भवती; शिक्षा टाळण्यासाठी आरोपीने काय केलं बघा…

काय नेमकं प्रकरण?

मृतक प्रताप सिंह हा नवरगाव सीमेवर असलेल्या एका प्रसिद्ध टूरिस्ट ढाब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य आचारी म्हणून काम करत होता. मात्र सहा महिन्यापूर्वी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. सुरुवातीला त्याने दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा ढाबा कर्मचाऱ्यांमध्ये होती. मात्र, नियमानुसार पोलिसांना या घटनेची माहिती देणे आवश्यक असतांना, ढाब्यावरील काही कर्मचाऱ्यांनी ही बाब लपवून ठेवली. कोणताही पुरावा मागे न ठेवण्याच्या उद्देशानये त्यांनी मृतदेह ढाब्याच्या मागील मोकळ्या जागेत नेऊन जमिनीत गाडून टाकला.

मात्र काही महिन्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची गांभीर्याने दखल घेत रामटेक पोलीस आणि ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या नवरगाव गाठले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयास्पद जागेचे खोदकाम करण्यात आले. काही तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सांगाडा आणि अवयव उत्खनन करून बाहेर काढले. प्राथमिक तपासाअंती हा मृतदेह प्रताप सिंह यांचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस पुढील वैधकीय चाचणीसाठी तो नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमनेही भेट देऊन महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

हत्येचा संशय

या प्रकरणात पोलिसांनी ढाब्यावर काम करणाऱ्या चार संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. जरी आत्महत्येची चर्चा असली तरी मृतदेह अश्या प्रकारे गुप्तपणे गाडण्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असावे, असा संशय पोलिसांना आहे. आता प्रताप सिंह यांचा मृत्यू आत्महत्येने झाला की हत्येने याचा उलगडा पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Jalgaon Crime: क्राईम थ्रिलरलाही लाजवेल असा कट; बनावट अपघात दाखवून विम्याचे 50 लाख लाटण्याचा प्रयत्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नवरगाव परिसरातील एका टूरिस्ट ढाब्यावर ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण होता?

    Ans: प्रताप सिंह महादेव सिंह बैंस उर्फ ठाकूर, जो त्या ढाब्यावर मुख्य आचारी म्हणून काम करत होता.

  • Que: प्रकरण कसे उघडकीस आले?

    Ans: नागपूर ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उत्खनन केले आणि जमिनीत पुरलेला मृतदेह सापडला.

Web Title: Nagpur crime six month old secret exposed cooks skeleton unearthed from dhaba premises in ramtek shocking case comes to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या
1

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !
2

Nagpur News : पावभाजी दिली नाही म्हणून कटरने हल्ला ; गळ्यावरचा वार गालावर बसला !

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो,’ नागपुरात भाजप नेते, कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाण यांच्या कडून बैठकीत थेट कानपिचक्या

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग
4

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची जोरदार तयारी; रविंद्र चव्हाणांचा विदर्भ दौरा, संघटनात्मक बैठकींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.