Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल लाखोंना घातला गंडा

महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2025 | 12:26 PM
लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल लाखोंना घातला गंडा

लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक; तब्बल लाखोंना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

नितीन बालाजी सुर्यवंशी (रा.मु. पो. हेळंब, तालुका देवणी, जिल्हा लातुर) असे बोगस जवानांचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय 23, रा. नागराळ, तालुका – मुखेड, जिल्हा नांदेड गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2024 रोजी ते आज रोजी पर्यंत सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन कॅप परिसर येथे घडला आहे. यामध्ये फिर्यादीची 1 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली.

दाखल फिर्यादीनुसार, भरत महाटे हे शेती करतात. तसेच लष्कर भरती व पोलीस भरती साठी प्रयत्न करत आहेत. त्यांना नितीन सुर्यवंशी हा 13 ऑगस्ट 2024 मध्ये उदगीर रेल्वे स्टेशन येथे भेटला. त्यावेळी त्याने त्यांना आर्मीमध्ये असून तो आर्मी मध्ये मुलांना भरती करतो असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी नितीन याने फिर्यादीला सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन येथे भेटायला बोलावले. त्यावेळी त्याने आर्मीचा युनिफॉर्म परिधान केला होता. त्याच्यात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर त्याने फिर्यादीला एका महिन्यात आर्मी मध्ये नोकरी लावून देतो त्यासाठी दोन लाख रुपये लागतील असे सांगितले. फिर्यादीनेही यावर विश्वास ठेवला. त्याला वेळोवेळी 1 लाख 75 हजार रुपये दिले.

19 जानेवारी 2025 रोजी एक लाख रुपये रोख सब एरीया कैंटीन येथे दिले. त्यावेळी त्याने फिर्यादीला मार्चमध्ये जॉईनिंग होईल असे सांगितले. त्यांनतर वारंवार फोन करुन कधी जॉईनिंग होईल असे विचारले असता तो फिर्यादीचे फोन टाळत होता. म्हणून फिर्यादिला नितीन बालाजी सुर्यवंशीवर संशय आल्याने सदर्न कमांड पुणे येथे जावून खात्री केली असता नितीन बालाजी सुर्यवंशी नावाचा व्यक्ती त्याठिकाणी नेमणुकीस नसल्याचे तक्रारदारांना समजले. नितीन बालाजी सुर्यवंशी याने नोकरी लावतो म्हणुन 1 लाख 75 हजार 550 रूपये घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली आहे. अशी बरीच जणांची फसवणूक झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

Web Title: It has come to light that many people were cheated on the pretext of joining the army nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Army Job
  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud News
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
1

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर
2

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
3

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…
4

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.