तुळशी विवाहानंतर लग्न सराईचा हंगाम सुरु होतो. लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच साडी खरेदी, दागिने इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. लग्नातील साड्यांची खरेदी करताना पिवळ्या आणि हिरव्या रंगाची साडी आवर्जून खरेदी केली जाते. कारण हिंदू विवाह सोहळ्यांमध्ये विधी लुकसाठी पिवळ्या रंगाची साडी नेसण्याची परंपरा आहे. पिवळी रंग अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे लग्नात पिवळ्या रंगाची नऊवारी किंवा सहावारी साडी परिधान केली जाते. चला तर जाणून घेऊया लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाच्या साडीला का दिले जाते विशेष महत्व? याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – pinterest)
लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाच्या साडीला का दिले जाते विशेष महत्व? जाणून घ्या यामागील परंपरा

लग्न सोहळ्यात पिवळ्या रंगाची साडी मंगळ, समृद्धी, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानून नेसली जाते. पिवळ्या रंगाच्या नऊवारी साडीमध्ये नवरी उठून दिसते.

पिवळा रंग भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा अतिशय आवडता मानला जातो, त्यामुळे तो शुभ आणि पवित्र आहे. हळदीच्या रंगाशी साधर्म्य असल्याने पिवळा रंग शुद्धता, पावित्र्य आणि शुभ आशीर्वादाशी जोडला जातो.

पिवळा रंग गुरु ग्रहाचे प्रतीक मानला जातो आणि अनेक पारंपरिक विधींमध्ये पिवळा रंग आनंदाचा व उत्साहाचा म्हणून निवडण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याच्या वेळी विशेष रंगाच्या साड्यांना खूप जास्त महत्व आहे.

पिवळ्या रंगाच्या अनेक शेड्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या साडीवर सोन्याचे, मोत्याचे किंवा हेरिटेज दागिने परिधान करून रॉयल लुक करू शकता.

पिवळ्या रंगाच्या साडीवर लाल, हिरवा, जांभळा, निळा किंवा साडीच्या काठाला मॅचिंग होणारा ब्लाऊज परिधान करू शकता.






