पत्नीला दागिन्याचा मोह नडला, कर्जबाजारी पतीने रात्रीच घात केला; पोलिसांना संशय आला अन्...
३० एप्रिलला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पानाच्या टाकीच्यामागे एक मृतदेह आढळून आला होता. हा इसम भिकारी असल्याचा किंवा हा इसम रेल्वेतून पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. आता या व्यक्तीची ओळख पातळी असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मावसभावानेच चाकूने वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे हा मृतक पोलीस रेकॉर्डवरील हिट्री शिटर कुख्यात आरोपी होता. त्याच्या विरोध जळगाव जिल्ह्यात १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नेमकं काय घडलं?
मृतकाचे नाव रमण बापू नामदास वय २४ असे आहे. अमळनेर ता. जळगाव खा. येथील तो रहिवासी होता. तो १५ दिवसांपूर्वी शेगाव येथे आला होता. मृतकावर अनेक गुन्हे दाखल असून जेलमधून शिक्षा भोगून तो शेगावात पोहोचला होता. तर ३० एप्रिल रोजी त्याचा मृतदेह हा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रुग्णालयाजवळील पाण्याच्या टाकीच्या मागे आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या व्यक्तीचा मृत्यू आकस्मिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे खळबळजनक सत्य समोर आले.
पोलिसांनी आपले तपासचक्रे फिरवून हेराकडून माहिती मिळवत याप्रकरणी मृतकाची ओळख पटवून घेतली. आरोपी महेश हनुमान कांबळे (२६, रा. सरकारी फैल) यास त्याच्या राहत्या घरातून रात्री ९ वाजताच्या सुमारास अटक केली. तर आणखी एका अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेण्यात आले. कुठलाही सुगावा नसतांना शेगाव शहर पोलिसांनी या गुन्ह्याचे रहस्य उलगडल्याची माहिती खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला धुळ्यात अटक; १० किलो गांजा जप्त