Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaigad Bomb Blast: जयगड परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट; महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब जप्त

Jaigad Bomb Blast: घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2026 | 10:28 AM
Ratnagiri News, Jaigad Blast, Crude Hand Bomb Explosion,

Ratnagiri News, Jaigad Blast, Crude Hand Bomb Explosion,

Follow Us
Close
Follow Us:
  • जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट
  • एक महिला गंभीर जखमी, पोलिसांकडून घटनास्थळावरून २९ जिवंत गावठी बॉम्ब जप्त
  • स्थानिकांकडून माहिती आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी सुरू
 

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वाटत-जांबारी फाटा परिसरात गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एक महिला गंभीर जखमी झाली असून, घटनास्थळावरून पोलिसांनी तब्बल २९ जिवंत गावठी हातबॉम्ब हस्तगत केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, बॉम्ब कोणी आणि कोणत्या उद्देशाने तिथे ठेवले होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

लाकडे गोळा करताना भीषण स्फोट

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७, रा. वाटत खंडाळा, जांबारी फाटा) या आज पहाटे साडेसहाच्या सुमारास जांभळी फाटा परिसरातील ‘भूत बंगला’ परिसराच्या मागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकूड तोडत असताना त्यांच्या हाताला उघड्यावर पडलेल्या गावठी हातबॉम्बचा स्पर्श झाला आणि अचानक जोरदार स्फोट झाला.

धोकादायक श्वानांना द्या विषाचे इंजेक्शन! सुप्रीम कोर्टाचा निर्णय; आदेशात फेरबदलाच्या मागण्या फेटाळल्या

या स्फोटात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळावरून २९ जिवंत हातबॉम्ब जप्त

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परिसराची सखोल तपासणी केल्यानंतर घटनास्थळावरून आणखी २९ जिवंत गावठी हातबॉम्ब जप्त करण्यात आले.

हे हातबॉम्ब नेमके कोणी आणि कशासाठी ठेवले होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mango Recipe: कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा रसाळ आंब्याचे सांदण, १० मिनिटांमध्ये तयार होणारी पौष्टिक

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या असून, परिसरातील संशयित हालचालींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.

फॉरेन्सिक पथकाकडून जप्त करण्यात आलेल्या बॉम्बची तपासणी केली जात असून, हे स्फोटक साहित्य किती जुने आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे रसायन वापरण्यात आले होते आणि त्यामागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती आणि संशयित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर जयगड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, नागरिकांना संशयास्पद वस्तूंना हात न लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

 

 

Web Title: Jaigad bomb blast crude hand bomb explosion woman injured ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Bomb Blast
  • Kokan News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी देखील CNG गॅसचा तुटवडा

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव! कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’
2

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव! कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.