
जयपूरमधील चौमून परिसरातील मशिदीबाहेर राडा
परिसराला आले छावणीचे स्वरूप
110 लोकांना पोलिसांनी केली अटक
जयपूर: जयपूरमध्ये काल चौमून भागातील एका मशिदीबाहेर जोरदार राडा झाल्याची घटना घडली. मशिदीबाहेर असलेले दगड हटवण्यावरून हिंसाचार झाला. पोलिस रोखण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांनी या भागात कर्फ्यू लागू केला. इंटरनेट बंदी केली होती. आता मात्र पोलिसांनी या घटनेवर कडक कारवाई केली आहे.
चौमून भागातील मशिदीबाहेर झालेल्या घटनेने हिंसक रूप धरण केले आहे. रविवार सकाळपर्यंत इंटरनेटवरील बंदी वाढवण्यात आली आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. आतापर्यंत 11 महिलांसाह 110 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
Bajrang Dal And RSS: बजरंग दल आणि RSS हे देशासाठी प्राणघातक कर्करोग; बड्या नेत्याची जहरी टिका
नेमके प्रकरण काय?
चौमून परिसरात एका मशिदीबाहेर काही दगड लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाशी झालेल्या चर्चेत ही दगड हटवण्यावर सहमती झाली. मात्र रात्री उशिरा काही लोकांनी रेलिनग बसून मशिदीबाहेर सीमा भिंतीचे काम सुरू केले. पोलिस हस्तक्षेप करण्यासाठी आले असतं तेथे निदर्शने सुरू केली गेली. पोलिसआणि कारवाई केल्यावर निदर्शन करणाऱ्या लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या.
त्यानंतर या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी कारवाई केल्यावर काही काळाने तेथील परिस्थिती निवळली. दरम्यान या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच 24 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मशिडीबाहेरील दगड हटविण्याचे काम शांततेत केले जाणार होते.
मात्र रात्रीच्या सुमारास तेथे काही लोकांनी रेलिंग बसवण्यास सुरुवात केली. तेव्हा काही लोकांनी त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली. विरोध एवढा वाढला की त्या विरोधाचे रूपांतर हिंसाचारात झाले. सध्या या परिसराला पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे.