Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT BABA Arrested: ‘आयआयटी बाबा’ला पोलिसांकडून अटक; सोशल मिडिया आणि ड्रग्स…, पहा संपूर्ण प्रकरण

सोशल मिडियावर जीव देण्याची धमकी दिल्याबद्दल जयपूर पोलिसांनी आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला अटक केली आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 03, 2025 | 05:31 PM
IIT BABA Arrested: 'आयआयटी बाबा'ला पोलिसांकडून अटक; सोशल मिडिया आणि ड्रग्स..., पहा संपूर्ण प्रकरण

IIT BABA Arrested: 'आयआयटी बाबा'ला पोलिसांकडून अटक; सोशल मिडिया आणि ड्रग्स..., पहा संपूर्ण प्रकरण

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ पार पडला आहे. यामध्ये आयआयटी बाबा खूप चर्चेत राहिलेले नाव आहे. मात्र आता आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मिडियावर जीव देण्याची धमकी दिल्याबद्दल जयपूर पोलिसांनी आयआयटी बाबा उर्फ अभय सिंहला अटक केली आहे. जयपूर पोलिसांनी रिद्धी-सिद्धी  परिसरातील एका हॉटेलमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले. यावलेस त्याच्याजवळ काही ड्रग्स देखील सापडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी आयआयटी बाबाला अटक केली आहे. दरम्यान त्याच्याजवळ गांजा (ड्रग्स) देखील सापडले असल्याचे समोर येत आहे. त्याच्यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आयआयटीबाबाने केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच आता जयपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अटक झाल्यावर आयआयटी बाबा काय म्हणाले? 

माझ्याजवळ थोडासा प्रसाद (गांजा) सापडला आहे. कोणीतरी सांगितले होते की बाबा जीव देणार आहेत. पोलिस एका विचित्र प्रकरणाचे निमित्त घेऊन आले होते.  मी त्यांना सांगितले की जर तुम्ही या प्रसादावर गुन्हा दाखल केला तर कुंभमेळ्यात इतके लोक तो पितात, तर त्या सर्वांना अटक करा.

प्रयागराज महाकुंभात IIT बाबाचा मोठा दावा

महाकुंभ सुरू झाल्यापासून, दररोज लाखो लोक प्रयागराजला पोहोचत आहेत. अलीकडे आयआयटीयन बाबा खूप चर्चेत आहे. त्यांनी IIT मुंबई येथून एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आता त्याचा आणखी एक VIDEO व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो असा दावा करीत आहे की त्याच्यामुळेच भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवून ऐतिहासिक विजय मिळवला होता, याची आठवण करून देतो.

IIT Baba VIDEO : मी भारताला T-20 World Cup 2024 जिंकून दिला…, प्रयागराज महाकुंभात IIT बाबाचा मोठा दावा

भारताला विश्वचषक जिंकून दिला

एका मीडिया मुलाखतीत IIT बाबांना विचारण्यात आले की, ते क्रिकेट पाहतात का? यावर उत्तर देताना तो म्हणाला, “हो, मी खूप क्रिकेट पाहिले आहे. मी भारताला २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला. मी वारंवार सांगत होतो की चेंडू हार्दिक पंड्याला द्या, पण रोहित शर्मा तसे करत नव्हता, अखेर त्याने ऐकले आणि भारत विश्वचषक जिंकला.”

भारत दुसऱ्यांदा विश्वविजेता बनला

२००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर टीम इंडियाला १७ वर्षे वाट पहावी लागली. अखेर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. हा विजय भारतीय संघासाठी खूप संस्मरणीय ठरला कारण त्यांनी कोणताही सामना न गमावता विजेतेपद जिंकले.

Web Title: Jaipur police arrested iit baba abhay singh about drugs case crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • crime
  • Jaipur
  • police

संबंधित बातम्या

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
1

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
2

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
4

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.