
मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांसह एक SUV आढळली होती. त्यानंतर या वाहनाशी संबंधित ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन 5 मार्च 2021 रोजी मृतावस्थेत आढळले. या दोन्ही घटनांचा तपास पुढे NIA कडे गेला आणि सचिन वाझेला मार्च 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जुलै 2026 मध्ये विशेष NIA न्यायालयाने वाझेचा आरोपमुक्त करण्याचा अर्ज फेटाळला होता.
100 कोटी खंडणी प्रकरण अपडेट: सचिन वाझेंना जामीन मंजूर पण…
न्यायालयाने आरोप निश्चित करण्यासाठी रेकॉर्डवर पुरेसे साहित्य असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर 1 ऑगस्ट 2026 रोजी विशेष NIA न्यायालयाने सचिन वाझे, प्रदीप शर्मा, सुनील माने यांच्यासह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले. त्यात गुन्हेगारी कट, हत्या, अपहरण तसेच UAPA अंतर्गत आरोपांचा समावेश आहे. आरोपींनी आरोप मान्य केलेले नसून प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
जिल्हा प्रवेशबंदी: प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदवून होईपर्यंत वाझे बृहन्मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करणार नाही. वाझेला आदेशाच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत या पाच जिल्ह्यांबाहेरील त्याच्या प्रस्तावित निवासस्थानाचा पत्ता द्यावा लागेल. तसेच आरोपी आपला पासपोर्ट एनआयएकडे जमा करेल.
हजेरी आणि ठिकाणाची माहिती ठेवणे: त्याला दर रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत त्याच्या स्थानिक पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल आणि एनआयए किंवा पोलिसांना कॉल/व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे ठिकाण सांगावे लागेल.
यूएपीए अंतर्गत गुन्हा: न्यायालयाने नमूद केले की, कारमध्ये डिटोनेटरशिवाय सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या या प्रथमदर्शनी थेट दहशतवादी कृत्य किंवा देशाच्या आर्थिक सुरक्षेला धोका ठरत नाहीत.
अंबानी कुटुंबाचा जबाब: न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणात कोणत्याही पीडित व्यक्तीचा किंवा अंबानी कुटुंबातील सदस्याचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
समानता: या प्रकरणातील इतर प्रमुख सह-आरोपींना (जसे की प्रदीप शर्मा आणि सुनील माने) सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आधीच जामीन मंजूर केला आहे.
दीर्घकाळ चाललेली अटक: आरोपी १३ मार्च २०२१ पासून कोठडीत आहे आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता (३२० साक्षीदार आणि १४,००० हून अधिक पानांचे आरोपपत्र), खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, जर आरोपीने जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले, तर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
मुंबईतील ‘सचिन वाझे पॅटर्न’ सोलापुरात; गुन्हे शाखेने पोलिसांना दिले दर …