Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2025 | 06:02 PM
Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ...; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ...; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण अपघात 
मद्यधुंद अवस्थेत डंपरने अनेकांना उडवले 
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ

Jaipur Dumper Accident: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. हरमाडा भागात अनियंत्रित डंपरने रस्त्यावर मृत्यूतांडव केले आहे. डंपर चालकाने अनेकांना ठोकले आहे. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे.

डंपर रस्त्यावर अनियंत्रित झाल्याने त्याने अनेकांना उडवले आहे. यामध्ये आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सर्वात पहिल्यांदा डंपरने एका कारला धडक दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

जयपुर में यमराज बनकर सड़क पर उतरा डंपर! 60 से ज्यादा लोगों को रौंदा, 19 की हुई मौत इस CCTV वीडियो को देखकर कांप जाएगी रूह#JaipurNews #Rajasthan #RoadAccident pic.twitter.com/0ADkFT7MNV — अभिषेक 'अजनबी' ✍🏻 (@abhishekAZNABI) November 3, 2025

डंपरने अनेक जणांना चिरडले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी नागरिकांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

तेलंगणामध्ये भीषण अपघात

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 70 हून अधिक प्रवासी असलेल्या बसची ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या 12 हून अधिक आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोहून येणारी आरटीसी बस थेट खडी भरलेल्या टिप्पर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. बस आणि टिप्पर ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमधील खडी बसमध्ये पडली आणि अनेक प्रवासी अडकले. टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते.

Telangana Accident : तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू

जखमींना रुग्णालयात दाखल

या धडकेमुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढून चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य कोणत्याही परिस्थितीत जलदगतीने पूर्ण केले पाहिजे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार दिले पाहिजेत.

Web Title: Jaipur road accident dumper driver hit car 19 death marathi news viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Accident
  • Jaipur
  • viral video

संबंधित बातम्या

बंगळूरूच्या रस्त्यावर मुलांची स्टंटबाजी! हातात दारू, तीन जण स्कूटरवरून – हा कसला वेडेपणा? Video Viral
1

बंगळूरूच्या रस्त्यावर मुलांची स्टंटबाजी! हातात दारू, तीन जण स्कूटरवरून – हा कसला वेडेपणा? Video Viral

Prayagraj मध्ये इमारत कोसळली; असंख्य लोक ढीगाऱ्याखाली अडकले; PM Modi यांनी व्यक्त केले दु:ख
2

Prayagraj मध्ये इमारत कोसळली; असंख्य लोक ढीगाऱ्याखाली अडकले; PM Modi यांनी व्यक्त केले दु:ख

इतकी पण काय लाचारी? थेट धावत्या बाईकवरच तरुणाने उघडलं ऑफिस; VIDEO पाहून नेटकरी हैराण
3

इतकी पण काय लाचारी? थेट धावत्या बाईकवरच तरुणाने उघडलं ऑफिस; VIDEO पाहून नेटकरी हैराण

केवळ 1199 रूपयांच्या Dhurandhar 2 थाळीत तब्बल 40 पदार्थ, सरदारजीची कमाल; पोटभर खाऊ शकतात ‘इतकी’ माणसं, Viral Video
4

केवळ 1199 रूपयांच्या Dhurandhar 2 थाळीत तब्बल 40 पदार्थ, सरदारजीची कमाल; पोटभर खाऊ शकतात ‘इतकी’ माणसं, Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.