
crime (फोटो सौजन्य: social media)
कशी केली मारहाण?
तुषार चंद्रकांत तायडे हा त्याचा आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होता. याचवेळी रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला तिथून यावल बोरावल रोडवर घेऊन गेले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे १ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
का केली मारहाण?
जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता. या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल?
पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे असे आरोपींपैकी दोघांचे नावे आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींना अटक झाल्यानंतर या हत्येमागचं खरं कारण समोर येणार आहे.
आरोपींना आमच्या ताब्यात द्या
तुषार चंद्रकांत तायडे याच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रस्ता आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता. एवढेच नाही तर आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणीही नातेवाईकांकडून करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर पाऊण तासांनी आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
Ans: जळगावात, यावल-बोरावल रोडवर तरुणावर हल्ला झाला.
Ans: जुन्या वादातून व Instagram वरच्या व्हिडिओवरून भांडण वाढले.
Ans: आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, शोध सुरु; नातेवाईकांनी आंदोलन केले.