
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकत होती. ती शुक्रवारे १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेली होती. ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर पोलिसांना धनश्री बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध मोहीम सुरुवात केली. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4.55 वाजता ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती. त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्याने अपहरणाचा संशय बळावला होता. मात्र तब्बल चार दिवसांनी धनश्रीचा मृतदेह गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत आढळून आला.
या घटनेची माहिती जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
इंस्टाग्राम व्हिडिओचा वाद ठरला जीवघेणा! जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव मधून एक मारहाणीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुषार चंद्रकांत तायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जळगावातील समता नगर परिसरातील रहिवासी आहे. त्याला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे.
कशी केली मारहाण?
तुषार चंद्रकांत तायडे हा त्याचा आजीवर अंत्यसंस्कार करून यावल तालुक्यातून दुचाकीने परत येत होता. याचवेळी रस्त्यात सात ते आठ जण चारचाकीतून आले आणि त्याला तिथून यावल बोरावल रोडवर घेऊन गेले. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा पहाटे १ वाजता मृत्यू झाला. या घटनेमुळे समता नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
का केली मारहाण?
जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या तरुणाने आरोपीविरुद्ध महिनाभरापूर्वी instagram वर एक व्हिडिओ केला होता. या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Ans: 12 डिसेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर तरवाडे बुद्रुक गावातून.
Ans: गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत.
Ans: चाळीसगाव पोलीस ठाणे व जळगाव एलसीबी पथक.