कसा केला उलगडा?
हापूड पोलिसांनी पीडित तरुणीबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तेव्हा, पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही. ही तरुणी दिल्ली- एनसीआरमधील असावी, असा हापूड पोलिसांना संशय आला. दिल्लीतील एका व्यावसायिकाने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की त्याच्या घरातील नोकराने संबंधित तरुणीची हत्या होतांना पाहिली आहे, अशी खळबळजनक माहिती दिली.
झारखंडमधील एका मुलीचा मृतदेह
व्यावसायिकाच्या माहितीनंतर, दिल्ली पोलीस आणि हापूड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण हापूडशी संबंधित असल्याचे दिसून आले. पोलिसांना जो मृतदेह सापडला तो मृतदेह झारखंडमधील एका मुलीचा असल्याचं समोर आलं.
कशी केली हत्या?
हापूडमधील रहिवासी असलेल्या अंकित आणि त्याची पत्नी यांनी झारखंड झारखंडहून त्या तरुणीला आणलं होतं. अंकितने पीडितेला मोलकरीण म्हणून काम देण्याची व्यवस्था केली. अंकित हा विवाहित होता. मोलकरीण त्याच्या घरी काम करत होती आणि त्याच्याच घरी राहत होती. एके दिवशी, आरोपी अंकितने संधी साधून पिडीतेसोबत बळबजबरीने लैंगिक संबंध ठेवले. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. मुलीने विरोध केला तेव्हा पोलिसात तक्रार करून त्याला त्याच्या पत्नीला तुरुंगात टाकणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच अंकित आणि त्याच्या पत्नीने तरुणीला दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना 27 ऑगस्ट रोजी घडली. आरोपी पती पत्नीने या पीडितेचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरला आणि तो 29 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह हापूडमधील एका शेतात फेकून दिला.
पोलिसांनी काय म्हंटले?
पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, “ही महिला दिल्ली-एनसीआरची असल्याचा आम्हाला संशय होता. व्यावसायिकाच्या मोकरणीने त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर, मृत महिलेची माहिती मिळाली आणि अंकित तसेच त्याच्या पत्नीने केलेला या गंभीर गुन्हा उघडकीस आला. आता, दोन्ही पती-पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Ans: झारखंडमधील तरुणी, नोएडात मोलकरीण म्हणून राहत होती.
Ans: दिल्लीतील व्यावसायिकाच्या नोकराने पोलिसांना माहिती दिली.
Ans: अंकित आणि त्याची पत्नी; दोघांनाही अटक करण्यात आली आहे.






