crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जळगावच्या बिलवाडी गावात किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीत एकाच मृत्यू झाला आहे तर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैधकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. ही हाणामारी माझ्याकडे पाहून का थुंकला? झाल्याचे समोर आले आहे. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
जत पंचायत समितीतील शाखा अभियंत्याची आत्महत्या, राजकीय दबावाची शंका; कुटुंबीयांनी केले गंभीर आरोप
गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु
गेल्या अनेक वर्षांपासून गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये वाद सुरु आहे. शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील व्यक्तीच्या दुचाकीला पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवून बाचाबाची केली होती. त्यानंतर आज रविवारी गावातील ग्रामपंचायत बांधकामस्थळी पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले आणि माझ्याकडे पाहून का थुंकला? या कारणावरून वाद चिघळला. लाकडी दांडे, पावड्या व अन्य साहित्य वापरून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला.
महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश
या हाणामारीत झालेल्या जखमींमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश आहे. यात एकाच मृत्यू झाल्याचं समोर आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव एकनाथ गोपाळ असे आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत रुग्णालयात संताप व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या घटनेनंतर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. रुग्णालयात गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
पती पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं मामाला जीवावर बेतलं
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती- पत्नीच्या वादात मध्यस्थी करणं पत्नीच्या मामाला जीवावर बेतलं आहे. पत्नीच्या मामाला पतीने चाकूने वार करत खून केला आहे. या हल्ल्यात सासरे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.