
Jalgaon Crime : जामनेर ST डेपोमधून चोरट्यांनी पळवली नवीकोरी बस; वाटेत टायर पंचर अन् डाव फसला!
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री जामनेर एसटी डेपोत घडून आली. डेपोमध्ये अलिकडेच नवीन बस आली होती. परंतु काही तासातच स्टाफच्या निदर्शनास आले की बस तिच्या जागेवर नाहीये. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. सीसीटीव्हीमध्ये दिसले की, एक व्यक्ती ड्रायव्हरच्या सीटवर बसून पार्किंगमधून बस रिव्हर्स घेताना दिसला. त्यानंतर संधी मिळताच त्याने बस डेपोमधून बाहेर नेली. चोरीची घटना ध्यानात येताच डेपो अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती पोलिसांपर्यंत पोहचवली.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लगेच बसचा शोध सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाला सुरुवात केली. काही वेळ तपास केल्यानंतर पोलिसांना समजले की, चोरांना बस फार दूरवर नेता आली नाही कारण बसचा टायर वाटेत पंक्चर झाला. यानंतर पोलिसांना घटनास्ठळी जाऊन बसला आपल्या ताब्यात घेतले.
सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
घटनेचा छडा लगेच लागला, बसही पुन्हा मिळाली पण या घटनेमुळे एसटी डेपोमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकी मोठी बस चोरांनी पळवली कशी आणि पळवून नेताना त्यांना कुणी पाहिलं कसं नाही, त्यावेळी सिक्योरिटी गार्ड काय करत होते? प्रश्न असाही आहे की, बसच्या येण्या-जाण्याची एंट्री होत होती की नाही, जर होते तर एग्झिटची एंट्री का नाही करण्यात आली. या प्रश्नांवर अधिकाऱ्यांचे उत्तर येणे अपेक्षित आहे. सांगितले जात आहे की, मागील काही काळापासून बस स्टँडच्या परिसरातून चोरीची प्रकरणे फार वाढली आहेत.
Delhi Crime: बायको की हैवान! पहिले दिली गोळी, मग दिला करंट अन् दोरीने घोटला गळा; नवऱ्याचा घेतला जीव
आरोपी फरार
सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींना पकडण्यासाठी शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. या बस चोरीमागे चोरांचा नक्की काय उद्देश होता हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे पुन्हा सुरक्षा व्यावस्थेवर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.