दिल्लीत हादरवून टाकणारी घटना (फोटो सौजन्य - iStock)
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मंजूला तिचा पती मुन्नालालच्या हत्येसाठी ५ लाख रुपयांची सुपारी मिळाली होती आणि तिने खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. धूर्त मंजूने पोलिसांना सांगितले की चोरांनी तिच्या पतीची हत्या केली आहे. घटनेच्या रात्री, मंजूने गुन्हा घडल्यानंतर लगेचच आरोपीला २०,००० रुपये दिले. या प्रकरणात, संगम विहार पोलीस स्टेशनचे एसएचओ गुरसेवक यांच्या पथकाने मृताच्या पत्नीसह तीन जणांना अटक केली असून, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोरी आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. डीसीपी दक्षिण अनंत मित्तल यांनी आज एका पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला.
Delhi Crime : सोशल मीडिया प्रेमात विष कालवतोय! दिल्लीतील ३ तरुणींचा घेतला बळी, जोडीदारांनीच संपवलं
गेल्या काही वर्षांमध्ये पत्नीने केलेल्या पतीच्या हत्येच्या अनेक केस समोर येत आहेत. सिया प्रकरण ताजे असतानाच आता दिल्लीतली ही भयंकर घटना समोर आली असून समाजातील गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ दिसून येत आहे. इतकंच नाही तर महिला आता गुन्हा करण्यात आघाडीवर असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान मंजूने आपला गुन्हा कबूल केला की नाही याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र पोलिसांनी याबाबत संपूर्ण माहितीचा खुलासा केला आहे. दरम्यान या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.





