Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य

जालना जिल्ह्यातील 20 वर्षीय हृषीकेश पवार याच्या हत्येचा तब्बल 10 महिन्यांनंतर डीएनए चाचणीच्या अहवालातून उलगडा झाला. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून आरोपीने त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह दुधना नदीत फेकला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 02:46 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पैशांच्या व्यवहारातून 20 वर्षीय हृषीकेश पवार याची गळा आवळून हत्या करण्यात आली.
  • पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह स्कॉर्पिओतून नेऊन दुधना नदीत फेकण्यात आला.
  • डीएनए अहवालातून मृताची ओळख पटल्याने आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना: जालना जिल्ह्यात तब्बल दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 20 वर्षीय तरुणाच्या हत्येचा अखेर डीएनए चाचणीच्या अहवालातून उलगडा झाला आहे. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हृषीकेश प्रकाश पवार याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह स्कॉर्पिओ गाडीतून दुधना नदीत फेकण्यात आला होता. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काय घडलं नेमकं?

अविनाश अंकुश वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. हृषीकेश पवार हा तरुण २२ सप्टेंबर २०२५ रोजी ‘मार्केटला जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता, मात्र तो परतला नाही. याप्रकरणी हृषीकेशच्या आईने तालुका जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. कदिम जालना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी अविनाश वाघमारे याला पोलिसांनी अटक केली होती. चौकशीदरम्यान, त्याने हृषीकेशच्या हत्येची कबुली दिली.

Kolhapur News: एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची लगबग सुरू… अन् विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप

कशी आणि का काली हत्या?

२२ सप्टेंबर २०२५ रोजी बठाण शिवारातील आपल्या शेतात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून हृषीकेशची गळा आवळून हत्या केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह स्वतःच्या स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन गोलापांगरी येथील पुलावरून दुधना नदीच्या पात्रात फेकून दिला होता. तपासादरम्यान अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी मृतदेहाची नोंद असल्याचे पोलिसांना समजले. तालुका जालना पोलिसांनी मृतदेहाचे हाडे आणि हृषीकेशच्या आईचे रक्ताचे नमुने न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले होते. नुकताच प्राप्त झालेल्या डी.एन.ए. अहवालात मयत तरुण हा हृषीकेश पवारच असल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल

वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हृषीकेशचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी डी.बी. पथकाच्या फिर्यादीवरून अविनाश वाघमारे याच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) २०२३ च्या कलम १०३ (१) (खून) आणि २३८ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Nagpur Crime: पत्नीला शेवटचं लोकेशन पाठवलं… आणि आंब्याच्या झाडाला घेतला गळफास; नागपूरच्या इंजिनिअरची धक्कादायक आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृषीकेश पवारच्या हत्येचा उलगडा कशामुळे झाला?

    Ans: डीएनए चाचणीच्या अहवालामुळे.

  • Que: आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली?

    Ans: स्कॉर्पिओ गाडीतून नेऊन दुधना नदीत फेकला.

  • Que: आरोपीविरुद्ध कोणता गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Jalna crime murder by strangulation following a money dispute body dumped in river dna test reveals the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
1

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
2

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
3

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
4

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.