
कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:१५ च्या सुमारास गणेश पारकर हे कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन जवळ असताना संशयित आरोपी सावकार सावळे (वय ५०), बाळू सावळे (वय ४५), सूरज गोडसे (वय २८) आणि विनय मालवणकर (वय २५) यांनी किरकोळ वादातून त्यांच्याशी हुज्जत घातली. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि सावकार सावळे याने गणेश पारकर यांच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केला. यामध्ये पारकर यांच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
तुझी बायको मला आवडते, तू तिला विसरून जा, नाहीतर…; नाशिकमधील धक्कादायक प्रकार
मारहाणीनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पारकर यांना नातेवाइकांनी तातडीने कोपरखैरणे येथील लाईन हॉस्पीटल आणि त्यानंतर ईशेलॉन रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील न्यू एरा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी गणेश पारकर यांच्या बहीण सुनिता पांडुरंग पारकर (वय ४८) यांच्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता च्या विविध कलमांन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता गणेश पारकर यांच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवले करण्यात आले आहे.
“या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, गुन्ह्यातील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसा पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या जातील,” अशी माहिती कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं नंतर शारीरिक संबंध ठेवले; दुरावा होताच तेच फोटो नातेवाईकांना पाठवले